Atul Subhash Case : अतुल सुभाष-निकिता सिंघानियाच्या लव्ह स्टोरीमध्ये कोण होता तो तिसरा, त्याच्यामुळेच संसारात वादळ
Atul Subhash Case : बंगळुरुतील AI इंजिनिअर अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात त्याचे वडील पवन सुभाष यांनी अनेक हैराण करणारे खुलासे केले आहेत. ते TV9 भारतवर्षशी बोलले. लग्नानंतर दोघांमध्ये कधी आणि कुठल्या कारणांमुळे संबंध बिघडले त्याबद्दल सांगितलं.
AI इंजिनिअर अतुल सुभाषच्या आत्महत्येच प्रकरण सध्या चर्चेत आहे. पत्नीसह पाच जणांवर आत्महत्येसाठी चिथावणी दिल्याचा आरोप करत अतुलने सोमावारी जीवन संपवलं. या प्रकरणात पोलिसांनी अतुलच्या पत्नीसह चार जणांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सध्या सगळे आरोपी फरार आहेत. या दरम्यान TV9 भारतवर्षने अतुलचे वडील पवन सुभाष यांच्याबरोबर चर्चा केली. अतुल सोबत काय-काय झालं? त्याला किती त्रास झाला? सूनेवर सुद्धा पवन यांनी गंभीर आरोप केले.
“लग्न केलं की, स्वत:च आयुष्य उद्धवस्त केलं, हे त्याला सुद्धा माहित नव्हतं. लग्नानंतर अतुल पत्नीच्या दबावाखाली होता. तिची प्रत्येक गोष्ट मान्य केली. तिची स्वप्न पूर्ण केली. पत्नीला ऑफिसला सोडण्यासाठी आणि तिला आणण्यासाठी रोज अतुल तिच्यासाठी 34 किलोमीटर प्रवास करायचा. प्रवासातच त्याचा दिवस जायचा” असं अतुलचे वडील पवन सुभाष यांनी सांगितलं.
‘तो दु:ख झेलत राहीला’
“27 एप्रिल 2019 रोजी लग्न केलं. तो आमच्यासोबत 29 एप्रिलपर्यंत राहीला. त्यानंतर तो इथे आला नाही. माझं वय 62 आणि पत्नी अंजूच वय 55 आहे. आमच्या वयाचा विचार करुन पत्नी निकिता त्याला किती त्रास देतेय, हे त्यानं कधीच सांगितलं नाही. तो दु:ख झेलत राहीला” असं पवन सुभाष यांनी सांगितलं.
‘आधी तुम्ही घेतलेले पैसे परत करा’
दोघांचे संबंध का बिघडले? त्यामागच खरं कारण पवन सुभाष यांनी सांगितलं. “दोघांचे संबंध आधी खराब नव्हते. कोरोनाकाळ सुरु झाला, त्यावेळी सर्वात खराब स्थिती बंगळुरुमध्ये होती. माझा सुनेला कोरोना झाला, त्यावेळी अतुलकडून एकच चूक झाली. त्याने आईऐवजी सासूला बोलावलं. हीच चूक त्याला भारी पडली. त्यानंतर सगळा खेळ बिघडला. सासू आल्यानंतर तिने माझ्या मुलाकडे पैसे मागायला सुरुवात केली. 16 लाख आधीच त्यांनी माझ्या मुलाकडून घेतले होते. आणखी 50 लाखाची मागणी करत होते. तुम्ही पैसे द्या, मी व्याजासह परत करीन असं सांगत होती. त्यावेळी अतुल बोलला की, मी आधीच माझ्या आई-वडिलांना न सांगता तुम्हाला पैसे दिले आहेत. मी तुम्हाला आता आणखी कर्ज देऊ शकत नाही. आधी तुम्ही घेतलेले पैसे परत करा” असं पवन सुभाष म्हणाले.
राग म्हणून 9 खटले भरले
अतुलने इतक सांगताच ते लोक चिडले. त्यानंतर ते मुलीला घेऊन जौनपूरला निघून गेले. तिथे नेल्यानंतर त्यांनी अतुलच त्याच्या मुलासोबत बोलणं बंद केलं. अतुलने जे त्यांना पैसे दिलेले, ते त्यांनी परत केले. त्यांना याचा इतका राग आला की, त्यांनी अतुलवर 9 खटले दाखल केले.