जन्मदात्या पित्याकडून अवघ्या 11 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, अहमदनगर हादरलं

अहमदनगर जिल्ह्यात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. एका पित्याने आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जन्मदात्या पित्याकडून अवघ्या 11 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, अहमदनगर हादरलं
बलात्कार करून चार वर्षाच्या चिमुरडीची क्रूर हत्या
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 3:04 PM

अहमदनगर : बाप आणि लेकीचं फार वेगळं भावनिक नातं असतं. हे नातं खूप महान आणि मोठं असतं. ते शब्दांमध्ये कधीच व्यक्त करता येणार नाही. पण अहमदनगर जिल्ह्यात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. एका पित्याने आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आपली वाटचाल आता नेमकी कोणत्या दिशेकडे सुरु आहे? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

आरोपी बापाला बेड्या

संबंधित घटना ही अहमदनगर जिल्ह्यातून समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जन्मदाता बापच आपल्या लेकीसोबत असं कसं वागू शकतो? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय. संबंधित घटनेप्रकरणी पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. पीडितेच्या आईने तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

पीडितेची आई गावी गेली असताना पित्याकडून कृत्य

पीडित 11 वर्षीय चिमुकलीची आई 28 जुलैला काही कारणास्तव बाहेरगावी गेली होती. त्याचदिवशी रात्री पीडितेच्या पित्याने ती झोपेत असताना तिच्यासोबत गैरप्रकार केला. विशेष म्हणजे आरोपीने त्यानंतरही पुन्हा दोनवेळा पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. याच दरम्यान आई गावावरुन घरी आल्यानंतर पीडिकेने आपल्या आईला हा सर्व प्रकार सांगितला.

पीडितेच्या आईची पोलिसात तक्रार

संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडितेच्या आईने प्रचंड रोष व्यक्त केला. तसेच पीडितेची आई पोलीस ठाण्यात गेली. तिथे तिने पोलिसांना सगळा गैरप्रकार सांगत आपल्या पतीविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारदार महिलेच्या सांगण्यानुसार आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे.

चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीवर दोघांचा बलात्कार

दुसरीकडे नाशिकमध्येही धक्कादायक घटना समोर आलीय. चौथीत शिकणाऱ्या अवघ्या नऊ वर्षांच्या मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना सिन्नर तालुक्यातल्या (जि. नाशिक) औंढेवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपीमध्ये एक सोळा वर्षांचा अल्पवयीन मुलगा आहे.

या भयंकर घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या शेतीची कामे सुरू आहेत. त्यामुळे मुलीचे आई-वडील तिला घरात ठेवून शेतात कामाला जात असत. मुलगी घरात एकटी असते, यावर नजर ठेवून गणेश ऊर्फ शंकर निवृत्ती कुंदे (वय 43, रा. औंढेवाडी) याने मुलीवर बलात्कार केला. तिच्या राहत्या घरी शेतात नेऊन हा अत्याचार केला. अत्याचार केल्याची माहिती कुणाला सांगितल्या कुटुंबाला ठार मारेन, अशी धमकी दिली. त्यानंतर एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलानेही मुलीवर जवळपास तीन वेळा अत्याचार केला.

चाकूचा धाक दाखवून अत्याचार

नाशिकमध्ये पवननगर भागात एका व्यावसायिक महिलेवर बलात्कार झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली होती. सराईत गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप झाला होता. या भागात पीडित महिलेचं ब्यूटी पार्लर आहे. महिला आपल्या पार्लरमध्ये पूजा करत असताना आरोपी तिच्या दुकानात घुसला होता. त्यानंतर आतून दरवाजा लावून आरोपीने तिला चाकूचा धाक दाखवला. महिलेच्या तोंडात बोळा कोंबून, तिचे हात बांधून तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा :

रिपाइंच्या दोन खंडणीखोर नेत्यांना बेड्या, आरे कॉलनीत वीस हजार घेताना रंगेहाथ अटक

औरंगाबादकरांनो.. पोलिसांच्या मदतीसाठी आता डायल करा 112 हेल्पलाइन क्रमांक, 5 मिनिटात मिळेल मदत

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.