बलात्कारात अपयशी ठरल्यानंतर बापाने मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठी घातली, सहा वर्षाची चिमुकली वेदनांनी विव्हळत राहिली

झारखंडची राजधानी असलेल्या रांची शहारात प्रचंड संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासली आहे. रांचीच्या सदर पोलीस ठाणे हद्दीत एका नराधम सावत्र बापाने अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

बलात्कारात अपयशी ठरल्यानंतर बापाने मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठी घातली, सहा वर्षाची चिमुकली वेदनांनी विव्हळत राहिली
minor girl
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 3:49 PM

रांची : झारखंडची राजधानी असलेल्या रांची शहारात प्रचंड संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासली आहे. रांचीच्या सदर पोलीस ठाणे हद्दीत एका नराधम सावत्र बापाने अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते करण्यात तो यशस्वी न ठरल्याने त्याला राग आला. त्यानंतर त्याने जे भयावह आणि भीषण असं विकृत कृत्य केलं ते सांगतानाही लाज वाटते. बलात्कार करण्यात अपयशी ठरल्यानंतर आरोपी बापाने अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठी घातली. या घटनेनंतर पीडिता प्रचंड जखमी झाली.

आईची पोलीस ठाण्यात तक्रार

पित्याच्या अमानुष कृत्यामुळे पीडिता प्रचंड जखमी झाली होती. ती वेदनांनी प्रचंड विव्हळत होती आणि आक्रोश करत होती. तरीदेखील आरोपी बापाला तिची दया आली नाही. पीडितेची आई जेव्हा घरी आली तेव्हा तिला जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत मुलगी निपचित पडलेली दिसली. तिने मुलीला काय झालं विचारलं. यावेळी सहा वर्षाच्या पीडितेने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. या घटनेमुळे आईच्याही पायाखालची जमीन सरकली. आपला पती इतका निर्घृण कसा वागू शकतो? असा सवाल तिच्या मनात आला. तिने वेळ न दडवता तिला तातडीने पोलीस ठाण्यात घेऊन गेली. तिथे महिलेने आपल्या लेकीसोबत झालेल्या गैरप्रकार पोलिसांना सांगितला.

पीडितेची प्रकृती नाजूक

संबंधित घटना ऐकून घेतल्यानंतर पोलीसही हैराण झाले. अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीसोबत इतकं निर्घृण कृत्य करताना हैवान बापाला तिची जराही दया आली नसेल? असा सवाल त्यांच्याही मनात येऊन गेला. त्यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तक्रार नोंद करुन घेतली. तसेच पीडितेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती सध्या नाजूक आहे.

पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपी बापाला शोधण्याचं काम हाती घेतलं. आरोपी बाप हा फरार होता. पण अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. आरोपी बापाला अटक केल्यानंतर संबंधित घटना जगासमोर आली. ही घटना माहिती पडल्यानंतर परिसरातील नागरिकांनाही धक्का बसला आहे. त्यांनी पीडितेला न्याय मिळावा यासाठी आरोपी बापाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे या घटनेमुळे पीडितेची आई आतून खूप खचली आहे. तिचं देहभान हरपलं आहे.

मुंबईतही सहा वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार

दुसरीकडे, महाराष्ट्राची राजधानी मुंबई पुन्हा एकदा एका महिला अत्याचाराच्या घटनेने हादरली आहे. विशेष म्हणजे अवघ्या सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. एका डिलिव्हरी बॉयने हे कृत्य केलं आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित घटनेप्रकरणी पीडितेच्या पालकांनी मुंबईच्या चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपी डिलिव्हरी बॉयला बेड्या ठोकल्या आहेत

नेमकं काय घडलं?

आरोपी डिलिव्हरी बॉय हा डिलिव्हरी करण्यासाठी एका इमारतीजवळ गेला होता. तिथे एक 6 वर्षांची मुलगी एकटी उभी होती. डिलिव्हरी बॉयने तिला पत्ता विचारला. त्यानंतर तो मुलीला तिथे घेऊन गेला. तिथे त्याने पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर आरोपी तिथून फरार झाला.

पोलिसांकडून आरोपीला बेड्या

संबंधित घटेननंतर पीडितेने आपल्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर संतापलेल्या कुटुंबियांनी तातडीने पोलीस ठाण्यात जावून तक्रार केली. पोलिसांनी या घटनेप्रकरणी पोस्को कायद्याअंतर्गत डिलिव्हरी बॉयला अटक केली. या आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास चारकोप पोलिसांकडून सुरु आहे.

महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ

देशात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील साताऱ्यात नुकतंच एक संताजनक घटना समोर आलीय. सातारा शहरातील एका उपनगरात एका 12 च्या वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील काकाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी नराधम काका दिली होती. मात्र पीडित मुलगी गरोदर राहिल्याने ही बाब उघडकीस आली. याबाबत मुलीच्या पालकांनी तात्काळ सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात आरोपीवर 376 कलमान्वये पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर अत्याचार करणारा आरोपी फरार झाला आहे. याबाबत पोलीस सखोल तपास करीत असून फरार आरोपी काकाचाही कसून शोध घेत आहेत.

हेही वाचा :

पत्नीच्या अनैतिक संबंधांचा संशय, मुलाची हत्या करुन नरबळी भासवण्याचा प्रयत्न, कोल्हापुरात बापाचा पर्दाफाश

काल पत्रकारांचे प्रश्न टाळले, आता व्हॉटस अप ग्रुपच सोडला? समीर वानखेडेंचं चाललंय काय?

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.