सोलापूरमध्ये एफडीएची मोठी कारवाई, एवढ्या किमतीचा साठा जप्त

| Updated on: Sep 08, 2022 | 11:45 PM

अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी या कारवाईबाबत माहिती दिली. गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये कृत्रिम तसेच भेसळयुक्त खवा मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचं वारंवार समोर आलंय.

सोलापूरमध्ये एफडीएची मोठी कारवाई, एवढ्या किमतीचा साठा जप्त
सोलापूरमध्ये एफडीएची मोठी कारवाई
Image Credit source: TV9
Follow us on

सोलापूर : सोलापुरात भेसळयुक्त खवा बनविणाऱ्या कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासना (FDA)ची मोठी कारवाई केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे हाकमाराम चौधरी यांच्या चौधरी दूध डेअरीमध्ये भेसळयुक्त खवा (Adulterated food) निर्मिती होत होती. खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनंतर अन्न औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या सहकाऱ्यासमवेत ही धाड (Raid) टाकलीय. या कारवाईमध्ये 1 लाख 68 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

डेअरी चालकाला तात्काळ व्यवसाय बंद करण्याची नोटीस

अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी या कारवाईबाबत माहिती दिली. गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये कृत्रिम तसेच भेसळयुक्त खवा मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचं वारंवार समोर आलंय. त्यामुळे अन्न औषध प्रशासन विभागाकडून भेसळयुक्त पदार्थ बनविले जात असल्यास प्रशासनाकडे संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले. सदर डेअरी चालकाला तात्काळ व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आलेली आहे.

…अन्यथा कारवाई करण्यात येईल

उपरोक्त नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा आणि मानद कायद्यानुसार पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच सर्व मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांनी अशा कृत्रिम खव्यापासून मिठाई बनवू नये. तसे आढळून आल्यास त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा