बीड : कुत्र्याच्या अंगावर गाडी गेल्याने दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना केज तालुक्यातील विडा येथे घडली असून या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत मारामारी केली आहे. (fight between two groups takes place due to one man hit dog by his vehicle)
केज तालुक्यातील विडा येथे एका व्यक्तीने कुत्र्याच्या अंगावरुन गाडी घातली. त्यानंतर जाब विचारण्यासाठी गेले असता कुत्र्याचा मालक तसेच ज्या व्यक्तीने कुत्र्याच्या अंगावरुन गाडी घातली त्यांच्यामध्ये वाद सुरु झाला. नंतर हा वाद चिघळत गेला. परिणामी या दोन्ही गटामध्ये दगडफेक तसेच तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये दोन्ही गटातील चार जण जखमी झाले आहेत.
कुत्र्याच्या अंगावर गाडी घातल्यामुळे दोन्ही गट एकमेकांवर दगडफेक करत होते. महिला तसेच मुलंसुद्धा या भांडणामध्ये सामील होते. महिला, मुलं आणि पुरुषांनी मिळून एकमेकांवर चक्क दगडांचा मारा केला. यामध्ये एकूण चार जण जखमी झाले आहेत.
पाहा व्हिडीओ :
दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर केज पोलिसात दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकाराचा तपास करत आहेत. मात्र, या घटनेचा व्हिडीओ समोर अल्यामुळे झालेली मारामारी पाहून लोक अवाक् झाले आहेत.
इतर बातम्या :
Video | मांस फस्त करण्यासाठी वाघांची धडपड, हवेत झेप घेताच थेट पाण्यात पडले, पाहा व्हायरल व्हिडीओ
Video | रस्ता ओलांडण्यासाठी मुलांची धडपड, मध्येच ट्रक आला अन् घोळ झाला, पाहा नेमकं काय घडलं ?
Video | फोटो काढताना सुंदर महिलेचा गोड नखरा, तरुणांच्या काळजाचं पाणी, पाहा व्हायरल व्हिडीओ
VIDEO | 15-20 सांबरांच्या कळपावर वाघिणीचा हल्ला, शिकारीचे अनेक प्रयत्न, पण…#viral | #ViralVideo | #tiger | #PenchNationalParkhttps://t.co/yvt02AVzT5
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 29, 2021
(fight between two groups takes place due to one man hit dog by his vehicle)