पुणे – पतीच्या मृत्यूनंतर 55 महिलेला मेट्रोमनी वेबसाईटवर स्वतःसाठी जोडीदार शोधणे चांगलेच महागात पडले आहे. पतीचे निधन झाल्यानंतर दोन पैकी एका मुलीचे लग्न झाले आहे. दुसऱ्या मुलीसाठी मुलगा शोधत असताना स्वतःसाठी जोडीदार स शोधायला सुरुवात केली. याचा दरम्यान पीडित महिलेची मेट्रोमनी वेबसाईटवर एका व्यक्ती सोबत ओळख झाली. पुढे ओळखीचे रूपांत मैत्री व प प्रेमात झाले. मी आयुष्यभर तुझी साथ निभावण्याची वचनही एकमेकांना देण्यात आले. या प्रकारे अनोळखी व्यक्तींने महिलेचा विश्वास घात केला.
अशी केली फसवणूक
त्यानंतर आरोपीने महिलेला मला पैश्यांची गरज असल्याचे सांगत सव्वाचार लाख रुपयांची मागणी केली. महिलेने ही त्या व्यक्तीच्या बोलण्याला बळीपडत ऑनलाईन पद्धतीने सव्वाचार लाख रुपये व्यक्तीच्या खात्यावर जमा केले. मात्र त्यानंतर काही दिवसांनी पीडित व्यक्तीने संबंधित व्यक्तीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला.मात्र त्या व्यक्तीचा फोन बंद लागला. त्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीने कधीच फोन केला नाही. त्यामुळे पीडित व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले व त्यांनी पोलिसात धाव घेतली.
मेट्रोमनी वेबसाईटवर महिलेला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यामध्ये आरोपीने महिलेला मी एका नामांकित कंपनीत व्यवस्थापक म्हणून दिल्ली येथे नोकरी करतो, असे सांगितले. महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर नियमितपणे तिच्यासोबत व्हिडीओ कॉल , फोन, चॅटिंग सुरु केले, त्यानंतर मला पैशांची खूप गरज आहे, लगेच परत करतो, असे म्हणून त्याने महिलेकडून सव्वाचार लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यास सांगून घेतले.
मानसिक आधारासाठी हवा होता जोडीदार
संबंधित पीडित महिला उच्च शिक्षित महिला आपल्या मुलींच्या सोबत रावेत परिसरात राहते. पतीच्या निधनानंतर महिलेलने नोकरी करत व्यवस्थित घराचा सांभाळा केला, मुलीची शिक्षण केले. त्यानंतर मुलीची लग्न झाल्यानंतर माझ्या सोबतीला कुणी तरी असावे, त्या व्यक्तीने मला मानसिक आधार द्यावा अशी अपेक्षा ठेवत महिलेने मेट्रोमनी वेबसाईटवर आपले खाते उघडले. मात्र आपला लग्न करण्याचा निर्णय कुणालाच पटणार नाही, असे वाटल्याने संबंधित महिलेने याबाबत कुणालाही माहिती सांगितली नाही.
Best Astro Tips:पैशांची चणचण भासतेय, मग ज्योतिषशास्त्रातील हे उपाय नक्की करुन बघा
108MP कॅमेरा, 6000 mAh बॅटरीवाला Motorola फोन स्वस्तात खरेदीची संधी, Flipkart वर ऑफर