विरार गोळीबार प्रकरणी शिवसेनेच्या चौधरींसह 8 जणांवर गुन्हा दाखल; बदला घेण्यासाठी फायरिंग केल्याचं उघड

विरारमधील गोळीबार प्रकरणात शिवसेनेचे सुदेश चौधरींसह 8 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरार पूर्व डीमार्ट जवळ दिवसाढवळ्या 4 गोळ्या फायर करून समय चौहान याची काल शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती

विरार गोळीबार प्रकरणी शिवसेनेच्या चौधरींसह 8 जणांवर गुन्हा दाखल; बदला घेण्यासाठी फायरिंग केल्याचं उघड
अल्पवयीन मुलीला प्रियकरानेच लुटलं Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 7:35 AM

विरार: विरारमधील गोळीबार प्रकरणात शिवसेनेचे (shivsena) सुदेश चौधरींसह (sudesh chaudhary) 8 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरार (virar) पूर्व डीमार्ट जवळ दिवसाढवळ्या 4 गोळ्या फायर करून समय चौहान याची काल शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक निशांत कदम यांची सप्टेंबर 2021 मध्ये हत्या झाली होती. याच हत्येचा बदला गोळीबार करून घेतला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात 302, 120 (ब), तसेच शस्त्र अधिनियम 3, 25, 27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समार्जित उर्फ समय विक्रमसिंह चौहान असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सुदेश चौधरी, निखिल कदम, सिद्धार्थ कदम, श्याम यादव, अनुराग पांडे, राज यादव, राहुल दुबे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नाव आहेत.

विरार पूर्व डी मार्ट जवळील श्रीकृष्ण फर्निचर समोरील रस्त्यावर समय चौहान आपल्या कार जवळ उभा होता. त्यावेळी मोटारसायकलवर आलेल्या दोन जणांनी येऊन अतिशय जवळून डोक्यात, छातीत 4 गोळ्या फायर करून तात्काळ फरार झाले. यात समय चौहान याचा मृत्यू झाला आहे. शिवसेनेचे सुदेश चौधरी, निशांत कदम, अनुराग पांडे यांचे विरार पूर्व फुलपाडा परिसरात बिल्डिंगच्या व्यवसायातून मागच्या 10 वर्षांपासून वाद चालू होता. याच वादातून सप्टेंबर 2021 मध्ये निशांत कदम याची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात समय चौहान हा मुख्य आरोपी असल्याचा आरोप निशांत कदम यांच्या कुटुंबीयांनी केला होता. पण पोलिसांनी समयाला या हत्येमध्ये अटक केली नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांचा राग होता.

बदल्यासाठी गुन्हा

निशांत कदम यांच्या हत्येचा बदला हत्येने घेतला असल्याचे दाखल झालेल्या गुन्ह्यावरून समोर आले आहे. समय चौहानच्या हत्या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या आरोपींपैकी निखिल कदम आणि सिद्धार्थ कदम हे हत्या झालेल्या निशांत कादम याचे सख्खे भाऊ आहेत. या घटनेत विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आमचा तपास सुरू आहे असे विरार पोलिसांनी सांगितले आहे.

हत्याप्रकरणाशी संबंध नाही

मी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हापासून मला कुठे ना कुठे अडकविण्याचे प्रयत्न सुरूच होते. आजच्या फायरिंग आणि हत्या प्रकरणात माझा काही संबंध नाही. मी घरी होतो. पण माझे नाव आरोपींमध्ये टाकल्याचे मला समजले. या प्रकरणात माझा काही संबंध नाही. माझे नाव जरी असले तरी पोलीस तपास करतील त्या तपासाला मी पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे, असे सुदेश चौधरी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

चाकुने सपासप वार, महिलेच्या हत्येने परळी हादरली, हत्येचं कारण काय?

Gujrat : ग्रीष्मा हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल, तालिबानी पद्धतीने हत्येने देश हादरलेला

महावितरण अधिकाऱ्यांच्या टेबलावर साप सोडणं महागात, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.