AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नीला माझ्यासोबत का पाठवत नाही, जावई सासूवर भडकला आणि…

छोटन हा दरभंगा ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रतन पट्टीचा रहिवासी आहे. २०१८ मध्ये त्याने स्वतःच्या आईचा खून केला होता. आईचा मृतदेह टंकीत फेकून तो पसार झाला होता

पत्नीला माझ्यासोबत का पाठवत नाही, जावई सासूवर भडकला आणि...
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 4:52 AM

नवी दिल्ली : जावयाने सासूला दोन गोळ्या मारून ठार केले. एक गोळी डोक्यावर, तर दुसरी गोळी खांद्यावर लागली. आरोपी छोटन हा गेल्या पाच वर्षांपासून फरार होता. पाच वर्षांपूर्वी त्याने आईची हत्या केली होती. छोटनच्या पत्नीने सांगितले की, तिची आई शेतावर गेली होती. तेवढ्यात मोठ्याने आवाज आला. शेतात पोहचली तेव्हा तिचा पती पळून जात होता. तिच्या आईची हत्या झाली होती.

सासूसोबत झाला वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटन हा पत्नीला आपल्याकडे परत घेऊन जाण्यासाठी आला होता. सासूने त्याला चांगलेच सुनावले. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून छोटनने तिच्यावर गोळीबार केला. छोटन हा दरभंगा ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रतन पट्टीचा रहिवासी आहे. २०१८ मध्ये त्याने स्वतःच्या आईचा खून केला होता. आईचा मृतदेह टंकीत फेकून तो पसार झाला होता.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी केला होता चाकूने हल्ला

छोटनच्या बहिणीने आईच्या हत्याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली होती. त्यानंतर छोटन फरार झाला. त्यानंतर त्याची पत्नी माहेरी गेली. तिथं जाऊन छोटन पत्नीला परत घेऊन जाण्यासाठी येत होता. एका वर्षापूर्वी २०२२ मध्ये छोटन चोरी करून सासूच्या घरी शिरला होता. सासू आणि बायकोवर चाकूने वारही केला होता. त्याचीही तक्रार पोलिसांत आहे.

पैशाच्या वादातून आईचा केला होता खून

मृतक महिला गायत्री देवीने आपल्या दुसऱ्या मुलीचे लग्न २०१५ ला रतन पट्टीतील छोटनसोबत लावून दिले होते. लग्नानंतर त्यांना दोन मुलं झाली. छोटनने २०१६ मध्ये घर बनवले. पैशावरून त्याचा आईसोबत वाद झाला. त्यावरून त्याने आपल्या आईचाच खून केला होता.

पत्नीच्या वडिलांनी दरभंगा येथे जाऊन एसपी कार्यालयात तक्रार केली. कुंडवा चैनपूरचे ठाणेदार रमन कुमार यांनी तपास सुरू केला. एसपी कांतेश मिश्रा यांनी सांगितले की, ही घटना रविवारी घडली. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.