Badlapur : ढिशक्याव…, बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबाराची घटना घडली आहे. संबंधित घटना ही संध्याकाळी सहा वाजता घडली आहे. विशेष म्हणजे संध्याकाळची वेळ ही अतियश गर्दीची वेळ असते. भर गर्दीत अशाप्रकारे गोळीबाराची घटना घडल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Badlapur : ढिशक्याव..., बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण
बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 7:23 PM

बदलापुरातील एका नामांकीत शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेमुळे बदलापूर शहर हादरलं आहे. या घटनेनंतर बदलापुरातील जनता थेट रेल्वे स्थानकात घुसली होती. शेकडो आंदोलकांनी घटनेच्या निषेधात रेल्वे रुळावर उतरत रेल्वे वाहतूक बंद पाडली होती. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला होता. पण आंदोलक आरोपीला जनतेच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत होते. अखेर दिवसभर रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करत रेल्वे मार्ग मोकळा केला होता. त्या घटनेनंतर आज पुन्हा बदलापूर रेल्वे स्थानक परिसर हादरलं आहे. कारण बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबाराची घटना घडली आहे. एका इसमाने दोघांवर गोळ्या झाडल्याची माहिती समोर येत आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. एका इसमाने दोघांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्राथमिक माहिती घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे.

गोळीबाराच्या घटनेचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. या व्हिडीओत पळापळ होताना दिसत आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर असलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. रेल्वे पोलिसांनी या घटनेची तातडीने दखल घेतली. पोलिसांकडून आता या घटनेचा सखोल तपास केला जातोय. ऐन गर्दीच्या वेळी अशाप्रकारे गोळीबाराची घटना घडणं हे धोकादायक आहे. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणात काय-काय कारवाई करतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाहा घटनेचा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....