Amravati Bus Firing | भयानक, महाराष्ट्रातल्या महामार्गावर रात्रीच्यावेळी चित्रपटात दाखवतात तसा खासगी बसवर गोळीबार
Amravati Bus Firing | महाराष्ट्रातल्या रस्त्यांवरुन प्रवास खरोखरच सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय. महाराष्ट्रातल्या एका प्रमुख महामार्गावर रात्री उशिरा गोळीबार झालाय. महत्त्वाच म्हणजे चित्रपटात दाखवतात तसा, पाठीमागून आलेल्या गाडीने धडाधड गोळ्या चालवल्या.
Amravati Bus Firing (स्वप्निल उमप) | महाराष्ट्रात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. महाराष्ट्रातील महामार्गावरुन रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. एका धावत्या ट्रॅव्हल बसवर गोळीबार झाला आहे. अगदी चित्रपटात दाखवतात तशा प्रकारची ही घटना आहे. त्यामुळे महामार्गावरुन प्रवासाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालय. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा जवळ रात्री उशिरा ही घटना घडली. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग 6 वरुन एक खासगी प्रवासी बस नागपूरच्या दिशेने चालली होती.
त्याचवेळी पाठीमागून आलेल्या बोलेरोने खासगी बसच्या ड्रायव्हरच्या दिशेने धडाधड गोळ्या चालवल्या. या गोळीबारात चारजण जखमी झाले आहेत. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा जवळ रात्री उशिरा 12 च्या सुमारास ही घटना घडली. हा गोळीबार का करण्यात आला? गोळीबार करणारे कोण होते? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीय.
गोळीबाराच कारण काय?
पहाटे पर्यंत पोलिसांनी या भागात नाकाबंदी लावली होती. गोळीबारात जखमी झालेल्या प्रवाशांना तिवसा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग 6 वरुन दररोज हजारो वाहन जात असतात. या घटनेमुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भितीच वातावरण आहे. कारण गोळीबार व्यक्तीगत कारणातून झाला की, लुटमारीच्या उद्देशाने ते अजून स्पष्ट झालेलं नाहीय.