महाराष्ट्रात पहिले एन्काऊंटर कोणत्या शहरात झाले? मुंबई, पुणे की…

first encounter in maharashtra: अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर झाले. राज्यात एन्काऊंटरला सुरुवात कधी झाली? कोणत्या अधिकाऱ्याने पहिले एन्काऊंटर केले? कोणत्या शहरात पहिले एन्काऊंटर झाले? अन् पहिले एन्काऊंटर कोणाचे झाले...

महाराष्ट्रात पहिले एन्काऊंटर कोणत्या शहरात झाले? मुंबई, पुणे की...
encounter
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 9:03 AM

first encounter in maharashtra: बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर अक्षय शिंदे याने अत्याचार केला होता. त्यानंतर या प्रकरणावरुन देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. बदलापूरकरांनी दहा तास रेल्वे रोको आंदोलन केले. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणी अनेक पाऊले उचलली. 23 सप्टेंबर रोजी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर झाले. त्यानंतर राज्यात अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु झाला आहे. अक्षय शिंदे याला जाहीर फाशी देण्याची मागणी बदलापूरकरांनी केली होती. घटनेच्या दीड महिन्यानंतर अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर झाले. राज्यात एन्काऊंटरला सुरुवात कधी झाली? कोणत्या अधिकाऱ्याने पहिले एन्काऊंटर केले? कोणत्या शहरात पहिले एन्काऊंटर झाले? अन् पहिले एन्काऊंटर कोणाचे झाले…

राज्यातील पहिले एन्काऊंटर संगमनेरमध्ये

मुंबईत गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व झाले होते. त्यामुळे पहिले एन्काऊंटर कुठे झाले असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मुंबईत झाले असणार? असे सर्वांना वाटते. परंतु राज्यातील पहिले एन्काऊंटर कोणत्याही मोठ्या शहरात झाले नव्हते. महाराष्ट्रात पहिले एन्काऊंटर 29 जानेवारी 1966 रोजी झाले होते. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर या छोट्या शहरात हे एन्काऊंटर झाले होते. गावगुंड असलेल्या किसन सावजी याचे एन्काउंटर वसंत गिरीधर ढुमणे या पोलीस अधिकाऱ्याने केले होते. वसंत ढुमणे यांनी लिहिलेल्या पुस्तकात राज्यातील हे पहिले एन्काऊंटर असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कोण होता किसन सावजी

किसन सावजी हा गावगुंड होता. 1949 सालापासून त्याच्यावर गुन्हे दाखल होते. सरकारी नोकरांवर हल्ला करणे, धमकावणे असे प्रकार तो करत होता. अफू, गांजा व दारूचाही व्यवसायातून त्याने गुन्हेगारी विश्वात नाव कमवले होते. त्याच्या अड्ड्यावर छापा टाकण्यास चांगले अधिकारी घाबरत होते. ज्या न्यायाधीशांनी त्याला शिक्षा ठोठावली त्या न्यायाधीशांना व त्यांच्या पत्नीला किसन सावजीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याला पकडण्यासाठी उच्च न्यायालयाने वॉरंट काढले. परंतु ते वॉरंट तीन वर्ष बजावले गेले नाही, इतकी दहशत त्याची होती.

हे सुद्धा वाचा

मुंबईतील हे पहिले एन्काऊंटर

मुंबईतील पहिले एन्काऊंटर मन्या सुर्वेचे होते. 1982 मध्ये त्याचे एन्काऊंटर इसाक बागवान, राजा तांबट या पोलीस अधिकाऱ्यांनी केले होते. मन्या सुर्वे याच्या जीवनावर 1990 मध्ये अग्निपथ हा चित्रपट बनला. त्यानंतर 2013 मध्ये आलेला ‘शूट आउट एट वडाला’ चित्रपट मन्या सर्वेच्या जीवनाशी मिळता जुळता आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.