Nashik | नाशिकमध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेल्या सिटीलिंक बससेवेचा पहिला बळी; जबर धडकेत पादचारी गतप्राण!

सिटीलिंक बससेवेची 8 जुलै पासून सुरुवात झाली आहे. त्यात पाच टप्प्यात 250 बस रस्त्यावर उतवण्याचे नियोजन आहे.

Nashik | नाशिकमध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेल्या सिटीलिंक बससेवेचा पहिला बळी; जबर धडकेत पादचारी गतप्राण!
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 3:39 PM

नाशिकः नाशिक शहरात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या, एसटी संपाच्या काळात महत्त्वाची जबाबदारी बजावणाऱ्या सिटीलिंक बससेवेला अखेर गालबोट लागले आहे. या बसने उडवल्यामुळे एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. सिटीलिंक बससेवेने घेतलेला पहिला बळी असून, द्वारका परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी चालकाविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा घडला अपघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वारका परिसरातील उड्डाणपुलाखाली दुपारी हा अपघात झाला. या घटनेत महापालिकेच्या बससेवेतील सीएनजी बस (एम.एच. 15-7723) कन्नमवार पुलाकडून द्वारकेकडे येत होती. दरम्यान, नेमके याचवेळी एक गृहस्थ रस्ता ओलांडत होते. या पादचारी व्यक्तीला सिटीबसने उडवले. या धडकेमुळे पादचारी व्यक्तीचे डोके, हात, पाय यांना गंभीर जखमा झाल्या. या व्यक्तीचा मृत्यू झाला. अजूनपर्यंत तरी या व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती. याप्रकरणी रिझान मोहम्मद सय्यद (रा. टाकळी रोड, जुना कथडा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिटीबस चालकाविगुद्ध भादंवि कलम 304 (अ), 279, 337, 338, मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 134/177, 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालेराव हे करत आहेत.

10 लाखांच्या पुढे उत्पन्न

सिटीलिंक बससेवेची 8 जुलै पासून सुरुवात झाली आहे. त्यात पाच टप्प्यात 250 बस रस्त्यावर उतवण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत 43 मार्गावर 150 बस रस्त्यावर उतवण्यात आल्या आहेत. नाशिक महानगरपालिकेने सुरू केलेल्या सिटीलिंक बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, दिवसाकाठचे उत्पन्न तब्बल 10 लाख रुपयांपेक्षाही पुढे गेले आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या या बस सेवेला अच्छे दिन आल्याचे दिसत आहे. हा राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या संपाचा परिणाम असला, तरी प्रवाशांनी देखील खासगी बसचा प्रवास न करता सिटीलिंकलाच प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.

संपात दिली साथ

सध्या राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. त्यामुळे खासगी वाहनातून प्रवास करताना अव्वाच्या सव्वा लूट सुरू आहे. हे पाहता सिन्नर ,ओझर, त्रंबकेश्वर, भगूर, गिरणारे, सायखेडा, मखमलाबाद या ग्रामीण भागातून सिटीलिंक बसला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नाशिक उद्योनगरी. ग्रामीण भागातून अनेक कामगार नाशिकमध्ये रोजगारासाठी येतात. त्यांना रोज खासगी वाहनाने प्रवास करून येणे अवघड असते. सातपूर भागात अनेक कामगारांचा रोज राबता असतो. त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी सिटीलिंक बससेवेने उत्तम जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे हे कामगार रोज सिटर रिक्षातून असुरक्षित प्रवास करण्याऐवजी थेट सिटीलिंक बससेवेचा पर्याय निवडत आहेत. मात्र, या बससेवेला या अपघाताने गालबोट लागले आहे.

इतर बातम्याः

Nashik | येवला येथे 19 रस्त्यांची कामे होणार; 5 कोटींचा निधी मंजूर, भुजबळांचे प्रयत्न सार्थकी

Nashik| नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबादमध्ये मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.