प्रेम केलं, पण पाच निरापराध कुटुबियांना जमिनीत गाडलं, गुंतागुंतीचं प्रकरण

मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यात भयंकर घटना समोर आली आहे. काही नराधमांनी‌ एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करून त्यांना एका शेतात खोल जमीनीत गाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

प्रेम केलं, पण पाच निरापराध कुटुबियांना जमिनीत गाडलं, गुंतागुंतीचं प्रकरण
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 4:34 PM

भोपाळ : मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यात भयंकर घटना समोर आली आहे. काही नराधमांनी‌ एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करून त्यांना एका शेतात खोल जमीनीत गाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी जवळपास वर्षभरानंतर पाच मृतदेह जमिनीखालून खोदून बाहेर काढले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. पण अद्यापही जमिनीचा मालक असलेला मुख्य आरोपी फरार आहे. त्याने प्रेम प्रकरणातून संबंधित कृत्य केल्याचा अंदाज पोलिसांना आहे. (five dead body found in farm at devas Madhya Pradesh)

नेमकं प्रकरण काय?

देवास जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातील पाच जण गेल्यावर्षी १३ मे पासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांना आली होती. पोलीय याप्रकरणी गेल्या वर्षभरापासून तपास करत होते. अखेर या प्रकरणाशी संबंधिक एक-एक आरोपी पोलिसांना सापडू लागला, तसतशी तपासाला आणखी गती येऊ लागली ( five dead body found in farm at devas Madhya Pradesh)..

…आणि खड्ड्यातून पाच मृतदेह सापडले

पोलिसांनी पकडलेल्या आरोपींच्या जबाबानुसार तपासाची चक्रे फिरवली. देवास जिल्ह्यातील नेमवार येथे सुरेंद्र चौहान नावाच्या व्यक्तीच्या शेतात जेसीबीच्या मदतीने खोदकाम सुरू केलं. संबंधित कारवाई ही मंगळवारी संध्याकाळी सुरू होती. यावेळी जेसीबीने दहा फूट खाली खोदल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. कारण त्या खड्ड्यातून चक्क पाच मृतदेह आढळले. ही मृतदेह तिच आहेत जे १३ मे २०२० पासून बेपत्ता होती. यामध्ये १ महिला, ३ युवती आणि एका युवकाचा समावेश आहे.

मुख्य आरोपीचा शोध सुरू

ज्या शेतातून मृतदेह मिळाली आहेत त्याच शेताचा मालक सुरेंद्र याने प्रेम प्रकरणातून हे कृत्य केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येतोय. आरोपी सरेंद्र हा सध्या फरार आहे. तो पोलिसांच्या हाथी आल्यानंतर पाच जणांच्या हत्येमागे आणखी वेगळं काही गूढ होतं का हे देखील समजण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या :

दहिसरमध्ये सोन्याच्या दुकानात लूट, मालकाची गोळी झाडून हत्या, नांगरे पाटील घटनास्थळी

आठ वर्ष मुंबईतच पोस्टिंग, बड्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली होणार, 727 जणांची यादीही तयार

मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांच्या मुलाला अटक, पत्नीच्या तक्रारीनंतर बेड्या

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.