बॉसची बोलणी खाऊन मस्तकात आग, घरी जाऊन मित्रांच्या डोक्यात बॅट घातली, दुहेरी हत्येनंतर म्हणतो…

बॉसच्या बोलण्यावर तो इतका चिडला की त्याने घरी पोहोचताच त्याने त्याच्या झोपलेल्या मित्रांवर बेसबॉल बॅट आणि चाकूने हल्ला केला. एक मित्र झोपला होता आणि त्याच अवस्थेत शॉनने त्याचा मारहाण करुन जीव घेतला.

बॉसची बोलणी खाऊन मस्तकात आग, घरी जाऊन मित्रांच्या डोक्यात बॅट घातली, दुहेरी हत्येनंतर म्हणतो...
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 1:20 PM

फ्लोरिडा : कर्मचारी आणि बॉसचे नाते आंबट-गोड असते. बॉसकडून कधी ज्युनिअर्सची स्तुती होते, तर कधी तो त्याच्या कनिष्ठांवर चिडचिडही करतो. मात्र आपल्या बॉसवरील नाराजी व्यक्त करण्याचा पर्याय ज्युनिअर्सकडे नसतो. अशा परिस्थितीत त्यांचा राग बऱ्याचदा दुसऱ्यावर निघतो. कधी घरी बायकोवर आवाज चढवला जातो, तर कधी मुलांना ओरडा पडतो. पण बॉसचा इतका राग आला, की कर्मचाऱ्याने दुसऱ्याची हत्या केली, असं क्वचितच पाहायला मिळत असेल. पण अलिकडेच एका अमेरिकन व्यक्तीने बॉसवरील रागातून आपल्या मित्राची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आता त्याला या गुन्ह्यासाठी शिक्षा देखील होणार आहे.

नेमकं काय घडलं?

39 वर्षीय शॉन रुनियन (Shaun Runyon) फ्लोरिडामध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. एक दिवस त्याचे आणि बॉससोबत कडाक्याचे भांडण झाले. प्रकरण इतके वाढले की दोघांमध्ये हाणामारी झाली आणि शॉन आपल्या बॉसला बुक्की मारून पळून गेला.

झोपलेल्या मित्रांवर बॅट-चाकूने हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉन त्याच्या कार्यालयातील काही मित्रांसोबत एका फ्लॅटमध्ये राहायचा. बॉसच्या बोलण्यावर तो इतका चिडला की त्याने घरी पोहोचताच त्याने त्याच्या झोपलेल्या मित्रांवर बेसबॉल बॅट आणि चाकूने हल्ला केला. न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, शॉनचा एक मित्र झोपला होता आणि त्याच अवस्थेत शॉनने त्याचा मारहाण करुन जीव घेतला.

हत्येनंतर इतरांना काय सांगितलं?

पोलिसांनी सांगितले की त्यावेळी फ्लॅटमध्ये 7 जण होते. त्यापैकी एकाला शॉनने भोसकले, त्याचा जागीच मृत्यू झाला, तर एक मित्र गंभीर जखमी झाला होता, त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बॉससोबत कुठल्या कारणावरुन भांडण झाले, की शॉनचा राग इतका टोकाचा वाढला आणि त्याने घरी येऊन आपल्या मित्रांना ठार केले, हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. जेव्हा शॉन आपल्या साथीदारांना मारल्यानंतर बाहेर आला, तेव्हा त्याचा रक्ताने माखलेला शर्ट पाहून लोक आश्चर्यचकित झाले. त्याने आपल्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. त्यामुळे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जिथे त्याला अटक करण्यात आली.

नवी मुंबईत बॉसची हत्या

दुसरीकडे, अंमली पदार्थ विक्रीच्या नफ्यातून जास्त हिस्सा घेतल्याने बॉसची हत्या करण्यात आल्याची घटना काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईत उघडकीस आली होती. तिघांनी आपल्या बॉसला घरात घुसून रॉडने मारुन संपवलं होतं. नवी मुंबईतील वाशी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली होती. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर तिघांनी पोलिसांना काय सांगायचं, याबद्दल एका मैदानात बसून योजना आखली होती.

मयत तरुणाविरुद्ध 15 गुन्हे दाखल

तिघेही आरोपी पोलिसांना तब्बल 8 तास उलटसुलट जबाब देत होते. मात्र सीसीटीव्ही फूटेज तपासून पोलिसांनी अखेर आरोपींना बेड्या ठोकल्या. हत्या करण्यात आलेल्या जेकब क्रिस्तोपा याच्या विरोधातही विविध पोलीस ठाण्यात 15 गुन्हे दाखल होते.

बॉसच्या हत्येचा कट

अंमली पदार्थ विक्रीच्या नफ्यातून मिळणाऱ्या रकमेचा ठराविक हिस्सा तिघांना दिल्यानंतर उर्वरित रक्कम जेकब क्रिस्तोपा स्वतःला ठेवायचा. परंतु आपल्यापेक्षा जेकब यालाच अधिक नफा मिळतो, ही गोष्ट तिघांनाही खटकत होती. त्यामुळे तिघांनी आपला बॉस जेकबला मारण्यासाठी कट रचला होता.

घरात लोखंडी रॉडने मारुन हत्या

बॉसच्या घरामध्ये जाऊन त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन हत्या करून तिघे जण पसार झाले होते. हत्या झालेली व्यक्ती सराईत गुन्हेगार असून त्याच्या तीन साथीदारांनी त्याची हत्या केल्याचा सुगावा पोलिसांना मिळाला. त्यामुळे अवघ्या 12 तासात पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणून तिघांना अटक केली.

संबंधित बातम्या : 

VIDEO | पुण्यात कर्मचाऱ्याने बॉसची महागडी बाईक भररस्त्यात जाळली, टोकाच्या रागाचं कारण काय?

नवी मुंबईत तिघांनी बॉसला घरात घुसून संपवलं, मैदानात बसून खोट्या जबानीचंही प्लॅनिंग

नव्या इमारतीत झोपलेल्या दोघा मजुरांची हत्या, आरोपी मजूर पसार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.