HD Revanna : ‘माझ्या आईच अपहरण झालय, तिचा लैंगिक छळ केला’, सेक्स टेप प्रकरणात मुलाचे गंभीर आरोप
HD Revanna : "1 मे रोजी मला मित्रांकडून समजलं की, माझ्या आईचे लैंगिक छळाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत" त्यानंतर राजूने पोलिसात आईच्या अपहरणाची तक्रार नोंदवली. प्रज्वल रेवन्नाच्या कथित सेक्स टेपमध्ये ज्या पीडित महिला दिसल्या, त्यात राजू एचडीची आई होती.
कर्नाटकातील सेक्स टेप प्रकरणाने देशाला हादरवून सोडलय. यात माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप आहेत. आरोपींवर अनेक महिलांच लैंगिक शोषण, बलात्कार केल्याचे गंभीर आरोप आहेत. कर्नाटकचे माजी मंत्री एच.डी. रेवन्ना यांच्याविरोधात अपहरणाच्या गुन्हयाची नोंद झाली आहे. जेडीएस आमदार एच.डी. रेवन्नाच्या सहकाऱ्यांनी माझ्या आईच अपहरण केलं असा आरोप 20 वर्षाच्या राजू एचडीने केला आहे. रेवन्ना यांच्या फार्म हाऊसवर राजू एचडी आणि त्याची आई काम करायची. एच.डी. रेवन्ना यांचा मुलगा प्रज्वल रेवन्नाच्या कथित सेक्स टेपमध्ये ज्या पीडित महिला दिसल्या, त्यात राजू एचडीची आई होती.
भारतीय दंड विधान संहितेच्या विविध कलमातंर्गत पोलिसांनी रेवन्ना आणि सतीश बाबान्ना विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. एच.डी. रेवन्नाने अटकपूर्व जामिनाची मागणी केली आहे. त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या एका दुसऱ्या महिलेच्या तक्रारीवरुन रेवन्ना आणि त्याच्या मुलाविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल झाली आहे. म्हैसूर जिल्ह्यातील केआर नगर पोलीस ठाण्यात 2 मे रोजी राजू एचडीने तक्रार नोंदवली. “29 एप्रिलपासून माझी आई बेपत्ता आहे. तिच्या लैंगिक छळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत” असा आरोप राजू एचडीने केलाय.
‘सतीशने 26 एप्रिलला आईला घरी आणून सोडलं’
“मी आणि माझ्या आईने सहावर्ष रेवन्नाच्या घरी आणि फार्म हाऊसवर काम केलं. आईने तिने वर्षापूर्वी तिथे काम करणं बंद केलं” असं राजूने तक्रारीत म्हटलय. “26 एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झालं. त्याच्या तीन-चार दिवस आधी सतीश नावाचा इसम आमच्या घरी आला. रेवन्नाची पत्नी भवानीने काही कामानिमित्त घरी बोलवल्याच त्याने आईला सांगितलं” असं राजू म्हणाला. “सतीशने 26 एप्रिलला आईला घरी आणून सोडलं. पोलीस घरी येऊ शकतात, म्हणून त्याने मला आणि आईला काही दिवसांसाठी गायब व्हायला सांगितलं” असं राजू म्हणाला.
‘मित्रांकडून समजलं आईचे लैंगिक छळाचे व्हिडिओ व्हायरल झालेत’
तीन दिवसानंतर 29 एप्रिलला रात्री 9 च्या सुमारास सतीश पुन्हा आला. तो जबरदस्ती आईला सोबत घेऊन गेला. रेवन्नाचा आदेश असल्याच त्याने सांगितलं. “पोलिसांनी आईला पकडलं, तर गुन्हा दाखल होईल, आम्ही सगळे तुरुंगात जाऊ” असं सतीशने सांगितल्याच राजूने तक्रारीत म्हटलं आहे. “1 मे रोजी मला मित्रांकडून समजलं की, माझ्या आईचे लैंगिक छळाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत” त्यानंतर राजूने पोलिसात आईच्या अपहरणाची तक्रार नोंदवली.