मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांच्या नावे सिन्नरमध्ये अफाट ‘माया’; पुनमिया पिता-पुत्राच्या नावे खरेदी, नाशिक पोलिसांकडून तपास सुरू

मुंबईचे वादग्रस्त ठरलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावे सिन्नरमध्ये अफाट 'माया' असून, त्यांनी ही मालमत्ता संजय पुनमियाच्या नावे खरेदी केल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी संजय पुनमियाविरोधात अग्रवाल नावाच्या व्यक्तीने सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांच्या नावे सिन्नरमध्ये अफाट 'माया'; पुनमिया पिता-पुत्राच्या नावे खरेदी, नाशिक पोलिसांकडून तपास सुरू
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सोमवारी हजर राहण्याचे चांदिवाल आयोगाचे आदेश
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 10:34 AM

नाशिकः मुंबईचे वादग्रस्त ठरलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावे सिन्नरमध्ये अफाट ‘माया’ असून, त्यांनी ही मालमत्ता संजय पुनमियाच्या नावे खरेदी केल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी संजय पुनुमियाविरोधात अग्रवाल नावाच्या व्यक्तीने सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या साऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, मुंबई पोलिसांची कस्टडी संपताच पुनुमियाला ताब्यात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय पुनमिया सध्या एका खंडणी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे. तो मुंबईचे वादग्रस्त ठरलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. पुनमिया ठाणे जिल्ह्यातला रहिवासी आहे. त्याने सिन्नर तालुक्यात अनेक मालमत्तांची खरेदी केली असून, त्यात धारणगाव, मिरगाव, पाथरे येथे कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याचे वृत्त दैनिक लोकमतने 11 ऑक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. ही जमीन पुनमियाने आपला मुलगा सनीच्या नावावरही खरेदी केली. त्यासाठी शेतकरी असल्याचे बनावट पुरावे जोडले. हे सारे सिन्नरच्या दुय्यम निबंध कार्यालयात बिनाबोभाट पार पडले. याचे कारण म्हणजे पुनमियाच्या डोक्यावर असलेला परमबीर सिंहाचा वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे पुनमिया पिता-पुत्रांच्या नावाचा वापर करून परमबीर सिंहांनीच ही जमीन खरेदी केल्याची चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने आता सिन्नरमध्ये एक तक्रारही दाखल झाली आहे.

अन् पुनमियाचे बिंग फुटले

संजय पुनमियाने जमीन खरेदीसाठी उत्तन (ठाणे) येथील खरेदी खताची कागदपत्रे जोडली होती. तीच त्याच्यासाठी अडचणीची ठरली आहेत. यातल्या पहिल्या कागदपत्रांची तपासणी केली. तेव्हा त्यात बाबुलाल अग्रवाल आणि त्यांच्या भावाचा सातबारा जोडल्याचे निदर्शनास आले. दुसऱ्या कागदपत्रांचा तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी तपास केला. तेव्हा त्या जमिनीचा मालकही पुनमिया नसल्याचे स्पष्ट झाले. एकंदर पुनुमियाने स्वतः बनावट कागदपत्रे सादर करून येथील जमीन खरेदी केल्याची प्राथमिकदृष्या समोर येत आहे.

पुनमिया भाजप आमदाराचा नातेवाईक

संजय पुनमिया हा भाजप आमदार गीता जैन यांचा नातेवाईक असल्याची चर्चा आहे. त्याने राजकीय दबावतंत्राचा वापर करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता एकीकडे परमबीर सिंहाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांनी स्वतःच देश सोडून पलायन केल्याची जोरदार चर्चा आहे. नेमकी अशा वेळी पुनमियाविरोधात सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे पुनमियाचे राजकीय दबावतंत्र आणि परमबीर सिंहाचा वरदहस्त सध्या कामी येत नाही. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

तपास खमक्या पोलीस अधिकाऱ्याकडे

विशेष म्हणजे या साऱ्या प्रकरणाची तक्रार आता सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल आहे. नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या साऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, मुंबई पोलिसांची कस्टडी संपताच पुनमियाला ताब्यात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सचिन पाटील यांची ओळख एक कडक आणि खमक्या पोलीस अधिकारी अशी ओळख आहे. त्यांच्या बदलीसाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. एका आमदाराने त्यासाठी दबाव लावला होता, अशी चर्चा होती. त्यांच्या बदलीचे आदेशही आले होते. मात्र, नागरिकांचा वाढता रोष आणि हे प्रकरण मॅटमध्ये गेल्याने सध्या सचिन पाटीलच पोलीस अधीक्षकपदी आहेत. त्यामुळे ते असे पर्यंत तरी या प्रकरणाची पाळेमुळे ते नक्कीच खणतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

बेनामी जमीन खरेदीप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांची कस्टडी संपताच पुनुमियाला ताब्यात घेऊन याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

– सचिन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक

इतर बातम्याः

अपार्टमेंटमध्ये नागोबा डोलाया लागला, हजार रुपयांसाठी ‘कोब्रा’ अडकावला दारावर; नाशिकमध्ये सर्पमित्राची नसती उठाठेव

कोरोना लस न देताच प्रमाणपत्र दिले, मालेगावमधला धक्कादायक प्रकार; राष्ट्रीय कर्तव्यात कसूर करणारे 10 शिक्षक निलंबित

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.