Sameer Wankhede | आर्यन खान प्रकरणात वानखेडेंची शाहरुखसोबत 18 कोटींची डील? क्रांती रेडकर म्हणाली..

सीबीआय अधिकाऱ्यांनी क्रांती रेडकरचा फोनसुद्धा ताब्यात घेतल्याचं वानखेडेंनी यावेळी सांगितलं. वानखेडे यांनी त्यांच्या परदेश दौऱ्याबाबतच्या खर्चाबद्दल चुकीची माहिती दिली होती, असंही एनसीबीच्या विशेष चौकशी पथकाच्या अहवालात म्हटलंय.

Sameer Wankhede | आर्यन खान प्रकरणात वानखेडेंची शाहरुखसोबत 18 कोटींची डील? क्रांती रेडकर म्हणाली..
क्रांती रेडकर, समीर वानखेडेImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 8:51 AM

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणातून वाचवण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील छाप्यादरम्यान आर्यनला वाचवण्यासाठी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील एनसीबीच्या पथकाने त्याच्या कुटुंबीयांकडे 25 कोटींची लाच मागून 18 कोटी रुपयांवर तडजोडीची तयारी दर्शवली होती. आर्यनाच्या कुटुंबीयांकडे खंडणी मागणारा खासगी पंच के. पी. गोसावी हा एनसीबीचा अधिकारी असल्याचं खोटं चित्रही वानखेडेंच्या पथकाने उभं केलं होतं. तसंच 17 जणांची नावं संशयित म्हणून वगळून त्यांना सोडण्याची परवानगी दिली होती. त्यात एका कथित ड्रग्ज विक्रेत्याचा समावेश होता, असा ठपका एनसीबीच्या विशेष चौकशी पथकाच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. यासर्व प्रकरणी आता समीर वानखेडेंची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरची प्रतिक्रिया समोर आली आहे.

“त्यांच्याविरोधातील सर्व आरोप खोटे आहेत, हे प्रत्येकाला माहित आहे. हे फक्त आरोप आहेत आणि आम्ही सीबीआयच्या चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करत आहोत. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही चौकशीला पूर्णपणे सहकार्य करतोय”, असं क्रांती म्हणाली. तर दुसरीकडे देशभक्त असल्याचं बक्षीस मिळत असल्याची प्रतिक्रिया वानखेडेंनी शनिवारी दिली आहे. “मी देशभक्त असल्याचं बक्षीस मला मिळत आहे. काल सीबीआयच्या 18 अधिकाऱ्यांनी माझ्या घरी छापे मारले. माझ्या पत्नी आणि मुलांसमोर जवळपास 12 तास ही छापेमारी सुरू होती. त्यांना 23 हजार रुपये आणि चार प्रॉपर्टीची कागदपत्रं सापडली. मी कामावर रुजू होण्याआधी ती प्रॉपर्टी घेतली होती”, असं ते म्हणाले.

सीबीआय अधिकाऱ्यांनी क्रांती रेडकरचा फोनसुद्धा ताब्यात घेतल्याचं वानखेडेंनी यावेळी सांगितलं. वानखेडे यांनी त्यांच्या परदेश दौऱ्याबाबतच्या खर्चाबद्दल चुकीची माहिती दिली होती, असंही एनसीबीच्या विशेष चौकशी पथकाच्या अहवालात म्हटलंय. वानखेडे यांनी आपल्या परदेश दौऱ्यांचे व्यवस्थित स्पष्टीकरण दिलेलं नाही. परदेश दौऱ्यांचे स्रोतही त्यांनी जाहीर केलं नाही. वानखेडे यांनी विभागाला न कळवता या खासगी संस्थेबरोबर महागड्या मनगटी घडाळ्यांची खरेदी-विक्री केल्याचंही चौकशी अहवालात म्हटलं आहे. तर वानखेडे यांची मालमत्ता आणि त्यांचं उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

हे सुद्धा वाचा

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....