चार भावंडं खेळता खेळता कारमध्ये घुसली, ती परतलीच नाही; दरवाजा उघडताच आईने हंबरडा फोडला; पुढे जे घडलं ते विचित्रच

गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील रंधिया गावात एका दुर्दैवी घटना घ़डली आहे. शेतमजुरांची मुले खेळत खेळत कारमध्ये घुसली तेव्हा अचानक कारचे दरवाजे लॉक झाले. त्यामुळे मुले आतच अडकली यानंतर त्यांच्यासोबतच जे झालं ते अत्यंत दुर्दैवी होतं.

चार भावंडं खेळता खेळता कारमध्ये घुसली, ती परतलीच नाही; दरवाजा उघडताच आईने हंबरडा फोडला; पुढे जे घडलं ते विचित्रच
Four children died after suffocating in a car
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 5:53 PM

काही अपघाताच्या घटना अशा असतात ज्यात खरचं हळहळ व्यक्त होते. मुळात अपघात हा कसा, कुठे आणि कोणत्या रुपात घडेल हेही काही सांगतास येत नाही.  गुजरातमधील अमरेली येथे गुदमरून चार मुलांचा मृत्यू झाला. ही चार मुले मध्य प्रदेशात राहणाऱ्या एका शेतमजुराची असून घराबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये खेळत होती. अचानक गाडीचं दारं बंद झालं आणि पुढे जे घडलं ते फारच विचित्र होतं. जेव्हा आई-वडिलांनीहे चित्र पाहिलं तेव्हा त्यांना जबरदस्त धक्का बसला.

नेमकी घटना काय? गुजरातमधील अमरेली य़ेथे एका कारमध्ये अडकून एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमरेलीतील रंधिया गावात रविवारी दुपारी ही घटना घडली.या प्रकरणाचा तपास करत असलेले डेप्युटी एसपी चिराग देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांचे पालक मध्य प्रदेशात राहणारे शेतमजूर आहेत. रविवारी भरत मंदानी हा शेतमालक त्यांना सोबत घेऊन शेतात कामाला गेला. शेतात जात असताना भरत मंदानी यांनी त्यांची कार तिथेच घराच्या बाहेर उभी केली. आई-वडील आणि शेतमालक तिथून निघाल्यावर घराबाहेर घेळत असेलली सर्व मुले गाडीत घुसली आणि खेळू लागली.

दरम्यान, अचानक कारचा दरवाजा बंद होऊन लॉक झाला. हा लॉक झालेली दरवाजा नेमका कसा उघडायचा हे काही त्या लहान मुलांना समजलं नाही. किंवा काच खाली कशी करायची हेही मुलांना कळत नव्हते.त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

गाडीतून उतरण्यासाठी मुलांनी खूप धडपड केली.

कारच्या आत ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्याने मुलांना गुदमरू लागले. त्या मुलांनी गाडीतून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला मात्र सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. मुळात म्हणजे बाहेरूनही कोणाचे फार त्यांच्याकडे लक्ष गेले नाही . वेळेत मदत न मिळाल्याने अखेर या मुलांचा गुदमरून मृत्यू झाला. डेप्युटी एसपी देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चार मुलांची वय दोन ते सात वर्षांच्या दरम्यान होती. सायंकाळी कार मालक व या मुलांचे पालक शेतातून घरी परतल्यानंतरहा कारमध्ये मुलांचे मृतदेह आढळून आले.

पोलिसांचा तपास सुरु

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चारही मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. अमरेलीचे डेप्युटी एसपी चिराग देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अपघाताच्या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या अपघाताबद्दलचा आणखी तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अपघातीच वाटत आहे. मात्र, या घटनेमागची कारणे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

Non Stop LIVE Update
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र.
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले....
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले.....
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?.
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र.
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?.