Beed Crime : सिगारेट पाकिट महाग का दिले विचारत चौघांकडून गोळीबार, मध्यरात्री घडलेल्या घटनेने परळीत खळबळ

क्षुल्लक कारणातून सामाजिक शांतता भंग करण्याच्या गुन्हेगारी घटना वारंवार घडत आहेत. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशीच एक घटना परळीत घडली आहे.

Beed Crime : सिगारेट पाकिट महाग का दिले विचारत चौघांकडून गोळीबार, मध्यरात्री घडलेल्या घटनेने परळीत खळबळ
क्षुल्लक कारणातून हॉटेलमध्ये गोळीबार
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 4:27 PM

बीड / 10 ऑगस्ट 2023 : क्षुल्लक कारणातून हॉटेलमध्ये गोळीबार केल्याची धक्कादायक घटना परळीत घडली आहे. परळी जवळील कण्हेरवाडी शिवारात ही घटना घडली. सिगारेटचे पाकिट महाग का दिले? अशी विचारणा करत चौघांनी तीन राऊंड फायर केले. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने यात कुणीही जखमी झाला नाही. घटनेनंतर आरोपी पळून गेले. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. हे चौघे कोण आहेत?, त्यांच्याकडे पिस्तुल कोठून आली याबाबत पोलीस तपासानंतरच निष्पन्न होईल. क्षुल्लक कारणातून घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

काय घडलं नेमकं?

परळीतील कण्हेरवाडी शिवारात सुरेश फड यांचे यशराज नावाचे हॉटेल आहे. हे हॉटेल सध्या विलास आघाव नावाचे व्यक्ती चालवतात. या हॉटेलमध्ये रात्री एकच्या सुमारास चौघे जण चहा पिण्यासाठी आले होते. त्यांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांकडे सिगारेट मागितली. कर्मचाऱ्यांनी सिगारेट देताच त्यांनी सिगारेट महाग का दिली? असे विचारले. यावरुन आरोपी आणि हॉटेल कर्मचारी यांच्यात जोरदार बाचाबाची सुरु झाली. हा वाद विकोपाला गेला आणि हाणामारी झाली.

यावेळी चौघांपैकी एकाने स्वतःकडील एकाने पिस्तुल काढली आणि हवेत एक राऊंड फायर केलं. गोळीबार होताच घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी हॉटेलचे शटर लावून घेतले. यामुळे आरोपी आणखी संतापले आणि त्यांनी हॉटेलच्या शटरवर दोन राऊंड फायर केले. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत पुढील तपास सुरु केला आहे. हॉटेल चालक विलास आघाव यांच्या फिर्यादीवरुन परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.