सामूहिक बलात्काराने नाशिक हादरले; वणी येथे 42 वर्षांच्या महिलेवर अत्याचार, 4 संशयितांना बेड्या
सामूहिक बलात्काराने नाशिक जिल्हा हादरला असून, वणी येथे एका महिलेवर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.
नाशिकः सामूहिक बलात्काराने नाशिक जिल्हा हादरला असून, वणी येथे एका महिलेवर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.
जिल्हा हादरवून टाकणाऱ्या या वृत्ताची सविस्तर माहिती अशी की, पीडित महिला आणि तिचा मित्र बसस्थानक परिसरात बसले होते. तेव्हा या परिसरात असलेल्या संशयितांनी त्यांना येऊन धमकी दिली आणि पीडितेवर बुधवारी रात्री अकरा वाजता सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात चार संशयितांविरोधात सामूहिक बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आणि या प्रकरणातील चारही संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. नाशिकसारख्या जिल्ह्यात सामूहिक बलात्काराच्या घटना घडत असतील तर आरोपींना पोलिसांचा जराही धाक राहिलेला नाही का, असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे. आरोपी धमकी देता, त्यानंतर सामूहिक अत्याचार करतात. बसस्थानक परिसरात अशा घटना घडतात. आरोपींच्या मनात पोलिसांविषयी भीती राहिलेली नाही. त्यातूनच या अशा घटना घडत आहेत, असे मत आता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
व्यावसायिक महिलेवर बलात्कार
नाशिकमध्ये पवननगर भागात एका व्यावसायिक महिलेवर बलात्कार झाल्याची घटना नुकतीच घडली होती. सराईत गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केले. या भागात पीडित महिलेचे ब्यूटी पार्लर आहे. आपल्या पार्लरमध्ये पूजा करत असताना संशयित आरोपी दुकानात घुसला. त्यानंतर आतून दरवाजा लावून आरोपीने तिला चाकूचा धाक दाखवला. महिलेच्या तोंडात बोळा कोंबून, तिचे हात बांधून तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. हिंमत करून महिलेने अंबड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र, अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आहे.
सिन्नरमध्येही गेल्या महिन्यात अत्याचार
नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील शहा शिवारात एका महिलेची दुचाकी अडवून तिच्यावर कारमध्ये बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वावी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सिन्नर तालुक्यातल्या शहा शिवारात सोमवारी पीडित महिला दुचाकीवरून जात होती. पंचाळे-कोळपे रोडवरून जाताना संशियत आरोपी प्रशांत राजाराम सांगळे (रा. माळेगाव, ता. सिन्नर) याने तिचा कारने पाठलाग सुरू केला. शेवटी त्याने महिलेला गाठले. महिलेच्या दुचाकीसमोर कार लावून अडवले. महिलेला बळजबरने आपल्या कारमध्ये टाकून दरवाजे बंद केले. महिलेने प्रतिकार आणि आरडाओरडा केला. मात्र, आरोपीने जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. सोबतच महिलेचे मोबाइलमध्ये फोटो काढले. या प्रकरणाची कुठे वाच्यता केली, तर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी दिली. या प्रकरणी महिलेने वावी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कलम 376, 341, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
इतर बातम्याः
गुलाबी थंडीत नाशिकमध्ये राजकीय धग; निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे प्रयोग जोरात
नाशिक महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 122 वरून 133; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
आनंदवार्ताः नाशिक-सुरत विमानसेवा 1 नोव्हेंबरपासून, दिल्लीसाठीही लवकरच मुहूर्त
तर पाचव्या अणि सहाव्या रेल्वे रुळांचे काम थांबवू; जितेंद्र आव्हाड यांचा इशाराhttps://t.co/yslNAt2J5m#jitendrawhad | #ncp | #centralrailway | #thane
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 28, 2021