Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अट्टल चोरट्यांना दणका, चोघांच्या आवळल्या मुसक्या! कल्याणमध्ये कारवाई, 9 बाईकसह 20 तोळे सोनं जप्त

Kalyan Theft : मोबाईल स्नॅचिंग प्रकरणातील आरोपी मुस्तफा जाफर हा कल्याण नजीक असलेल्या आंबिवली येथील इराणी वस्तीत लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

अट्टल चोरट्यांना दणका, चोघांच्या आवळल्या मुसक्या! कल्याणमध्ये कारवाई, 9 बाईकसह 20 तोळे सोनं जप्त
चार अट्टल चोरट्यांसह लाखोंचा मुद्देमालही जप्त
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 1:25 PM

कल्याण : कल्याणमध्ये 4 अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी (Kalyan Mahatma Phule Chouk Police) मोठी कारवाई करत आठवडाभरात गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या चोघांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी मोबाईलसह सोनंही जप्त करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये चैन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या होत्या. चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला होता. दरम्यान, अखेर धडाकेबाज कामगिरी करत चार अट्टल चोरट्यांना अखेर अटर करण्यात आली आहे. या चार चोरट्यांच्या अटकेमुळे तब्बल 24 गुन्ह्यांची उकल झाली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. कल्याण परिसरात मोबाईल स्नॅचिंग (Mobile Snatching),चैन स्नॅचिंग (Chain Snatching), बाईक चोरी, बॅग लिफ्टिंगच्या घटना वाढल्या होत्या. हे गुन्हे रोखण्यासाठी आणि गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसंच आरोपींना अटक करण्यासाठी कल्याण महात्मा पोलिसांच्या पथकाने जंग जंग पछाडले होते. अखेर मागील आठवडाभरात कल्याण महात्मा फुले पोलीसांच्या पथकाने तब्बल 24 गुन्हे उघडकीस आले आहे.

सराईत चोर अटकेत!

मोबाईल स्नॅचिंग प्रकरणातील आरोपी मुस्तफा जाफर हा कल्याण नजीक असलेल्या आंबिवली येथील इराणी वस्तीत लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण महात्मा पोलिसांनी या वस्तीत कोम्बिंग ऑपरेशन केलं. यानंतर सापळा रचून मुस्तफा जाफर उर्फ इराणी याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपी मुस्तफाने 8 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात चैन स्नॅचिंग आणि दुचाकी चोरीचे 16 गुन्हे दाखल होते.

कुणाकुणाला अटक?

कल्याण मधील विविध विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकीच्या गुन्ह्याचा तपास करत या गुन्ह्यांमध्ये साजिद अन्सारी , आकाश यशवंते, जॅक बिका यांनाही अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरात केलेल्या या कारवाईत कल्याण महात्मा फुले पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

24 गुन्ह्यांचा उलगडा करत, 4 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण 200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 2 मोबाईल फोन, 9 मोटार सायकली आणि रोख रक्कम असा एकूण 15 लाख 38 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, उपआयुक्त सचिन गुंजाळ पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, प्रदीप पाटील, दीपक सरोदे, सागर चव्हाण व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रातील घाटात पंजाबमधील ट्रकचालकाचा कुणी केला खून? 24 तासांच्या आत पोलिसांनी लावला शोध!

जुगार अड्ड्यावर छापा, 20 लाखांच्या साहित्यासह 13 जण ताब्यात, कुणाच्या आशीर्वादानं सुरु होता अड्डा?

‘आय लव्ह यू पप्पा, काळजी घ्या’ गळफास घेतलेल्या जान्हवीची सुसाईड नोट वाचून वडील हादरले

'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार.
'मी बोललो तर ठाकरेंना देश सोडावं लागेल', रामदास कदम भरसभेत कडाडले
'मी बोललो तर ठाकरेंना देश सोडावं लागेल', रामदास कदम भरसभेत कडाडले.
'...तर धसच जबाबदार', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगे पाटलांचा हल्लाबोल
'...तर धसच जबाबदार', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगे पाटलांचा हल्लाबोल.
ठाकरेंच्या या 3 नेत्यांची हाकालपट्टी, शिंदेंचा 'धनुष्यबाण' हाती घेणार?
ठाकरेंच्या या 3 नेत्यांची हाकालपट्टी, शिंदेंचा 'धनुष्यबाण' हाती घेणार?.
'आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी ते वाहून जातील', दानवेंची जीभ घसरली
'आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी ते वाहून जातील', दानवेंची जीभ घसरली.
'मला हात लावला तर उडी घेईन', 'म्हाडा' मुख्यालयात महिलेने उधळल्या नोटा
'मला हात लावला तर उडी घेईन', 'म्हाडा' मुख्यालयात महिलेने उधळल्या नोटा.
उदय सामंतांचा तो धंदाच, ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, कोणाचा हल्लाबोल?
उदय सामंतांचा तो धंदाच, ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, कोणाचा हल्लाबोल?.
भास्कर जाधवांकडून खंत व्यक्त; म्हणाले, 'क्षमतेप्रमाणे मला काम...'
भास्कर जाधवांकडून खंत व्यक्त; म्हणाले, 'क्षमतेप्रमाणे मला काम...'.
शनिशिंगणापूरच्या शनिला ब्रँडेड तेलाने अभिषेक, देवस्थानाचा निर्णय काय?
शनिशिंगणापूरच्या शनिला ब्रँडेड तेलाने अभिषेक, देवस्थानाचा निर्णय काय?.
ममता कुलकर्णींचा यूटर्न, 'किन्नर'च्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा मागे
ममता कुलकर्णींचा यूटर्न, 'किन्नर'च्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा मागे.