वाढीव व्याजाचे आमिष दाखवत करोडोची फसवणूक, बंटी-बबली विरोधात गुन्हा दाखल

वाढीव व्याजाचे आमिष दाखवत आरोपींनी गुंतवणूक करण्यास नागरिकांना भाग पाडले. मग काही महिने व्याजाचे पैसे दिले. नंतर व्याजाचे पैसेही दिले नाहीत की गुंतवलेली रक्कमही दिली नाही.

वाढीव व्याजाचे आमिष दाखवत करोडोची फसवणूक, बंटी-बबली विरोधात गुन्हा दाखल
जेष्ठ नागरिकाला एकटे गाठत भररस्त्यात लुटलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 1:36 PM

डोंबिवली : वाढीव व्याजदराचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची करोडोची फसवणूक केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी बंटी-बबली दाम्पत्याविरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाम्पत्याने 17 गुंतवणूकदारांची 2 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत विष्णुनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपींची एमएमव्ही कन्सलटन्ट मेघा इंडिया नावाची कंपनी आहे. या कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगत आरोपींनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली. अमोल कृष्णा डोंगरीकर आणि अनन्या अमोल डोंगरीकर अशी आरोपी जोडप्यांची नावे आहेत.

वाढीव व्याजाच्या आमिषाला बळी पडत करोडो गुंतवले

एमएमव्ही कन्सलटन्ट मेघा इंडिया या कंपनीत 50 हजार ते 40 लाख रुपयांपर्यंत रकमा गुंतवल्यास वाढीव व्याज मिळेल असे आमिष आरोपींनी गुंतवणूकदारांना दाखवले. या आमिषाला बळी पडत गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत गुंतवणूकदारांनी आरोपींच्या कंपनीत करोडोची गुंतवणूक केली. चेंबूर येथील सेवानिवृत्त गुंतवणूकदाराच्या तक्रारीवरुन पोलिसात गुन्हा दाखल केला.

एका गुंतवणूकदाराच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

चेंबूर येथील सेवानिवृत्त ओमप्रकाश सरोया यांनाही वाढीव व्याजाचे आमिष दाखवले होते. डोंगरीकर दाम्पत्याने दरमहा 25 हजार रुपये व्याज देण्याचे आमिष दाखवत 25 लाख रुपये गुंतवण्यास सांगितले. त्यानुसार सरोया यांनी आरोपींच्या कंपनीत 25 लाख रुपये गुंतवले. सुरवातीला काही महिने ठरल्याप्रमाणे 25 हजार रुपये व्याज खात्यात येत होते. त्यानंतर व्याज येणे बंद झाले.

हे सुद्धा वाचा

यानंतर सोरया यांनी दाम्पत्याकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. मात्र दाम्पत्य पैसे परत करण्यास टाळाटाळ करत होते. यानंतर सोरया यांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि डोंगरीकर दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. पोलीस तपासात आणखी 13 लोकांची अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...