Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivali Bank Fraud : आयसीआयसीआय बँकेची तब्बल 3 कोटी 57 लाख रुपयांची फसवणूक, डोंबिवलीत धक्कादायक प्रकार

ग्राहकांची खाती, त्यांच्या ठेव रकमांच्या बदल्यात आयसीआयसीआय प्रुडेन्शीअल पॉलिसी काढल्या. बँकेच्या अंतर्गत तपासणीत हा गैरव्यवहार उघडकीला आला. याप्रकरणाची बँकेने स्वतंत्र चौकशी केली. त्यावेळी जनसंपर्क व्यवस्थापक याख्मी व त्याच्या साथीदारांनी हा गैरप्रकार केल्याचे पुढे आले.

Dombivali Bank Fraud : आयसीआयसीआय बँकेची तब्बल 3 कोटी 57 लाख रुपयांची फसवणूक, डोंबिवलीत धक्कादायक प्रकार
एअरपोर्टवर नोकरीला लावतो सांगून तरुणीची 73 हजाराची फसवणूकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 10:04 PM

डोंबिवली : डोंबिवलीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवली एमआयडीसी निवासी विभाग येथील आयसीआयसीआय (ICICI) बँकेतील जनसंपर्क व्यवस्थापक आणि त्याच्या साथीदारांनी बँकेत फसवणूक (Fraud) केल्याची घटना घडली आहे. खातेदारांच्या व्यवहारात बेकायदा आर्थिक उलाढाली करून बँकेची आणि खातेदारांची तब्बल 3 कोटी 57 लाख 49 हजार 141 रुपयांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी आयसीआयसीआय बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक पवन अशोक माळवी यांनी मानपाडा पोलीस (Manpada Police) ठाण्यात बँकेचे जनसंपर्क व्यवस्थापक आशीष याख्मी व त्याच्या इतर साथीदारांविरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

मित्र आणि वडिलांच्या नावे फेक व्यवहार करुन पैसे लाटले

सन 2019 पासून ते फेब्रुवारी 2021 पर्यंत डोंबिवली एमआयडीसीतील ममता रुग्णालया शेजारील आयसीआयसीआय बँक शाखेत हा गैरप्रकार सुरू होता. पोलिसांनी सांगितले, आयसीआयसीआय बँकेचे जनसंपर्क व्यवस्थापक आशीष याख्मी आणि त्याच्या साथीदारांनी संगनमत करून आयसीआयसीआय बँक खातेदारांच्या परवानगी शिवाय ग्राहकांच्या खात्यात असलेल्या रकमा, त्यांच्या ठेव मुदतीच्या पावत्यांवर स्वतःचे मित्र, वडिल यांच्या नावे व्यवहार करून काही रकमा काढून घेतल्या. ज्या ग्राहकांनी गुंतणुकीसाठी धनादेश दिले. त्या धनादेशांवर खाडाखोड करून, नावे बदलून, बनावट स्वाक्षऱ्या करून त्या धनादेशांवरील रकमा लबाडीने स्वतःच्या नावे काढून घेतल्या. हे सगळे व्यवहार सुरू असताना बँक आणि ग्राहकांना कोणताही सुगावा लागणार नाही याची काळजी आरोपी आशीष व त्याचे साथीदार घेत होते.

ग्राहकांची खाती, त्यांच्या ठेव रकमांच्या बदल्यात आयसीआयसीआय प्रुडेन्शीअल पॉलिसी काढल्या. बँकेच्या अंतर्गत तपासणीत हा गैरव्यवहार उघडकीला आला. याप्रकरणाची बँकेने स्वतंत्र चौकशी केली. त्यावेळी जनसंपर्क व्यवस्थापक याख्मी व त्याच्या साथीदारांनी हा गैरप्रकार केल्याचे पुढे आले. बँक आणि ग्राहकांची फसवणूक केल्याने बँकेने तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक अनिल पडवळ या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Fraud of Rs 3 crore 57 lakh from ICICI Banks public relations manager in Dombivali)

हे सुद्धा वाचा

'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.