व्हीआयपी मोबाईल नंबर मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक, पोलिसांनी ‘असा’ केला पर्दाफाश

हल्ली लोकांमध्ये व्हीआयपी नंबरचे क्रेझ फार आहे. यासाठी ते कितीही पैसे मोजायला तयार असतात. पण हा शोक कधी कधी त्यांना भारी पडतो आणि फसवणुकीचे बळी होतात.

व्हीआयपी मोबाईल नंबर मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक, पोलिसांनी 'असा' केला पर्दाफाश
व्हीआयपी मोबाईल नंबरचे आमिष दाखवत फसवणूकImage Credit source: freepik
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 9:58 PM

भाईंदर : गाड्यांच्या नंबर प्लेट्स किंवा आपल्या मोबाईलचा नंबर युनिक असावा, अशी अनेकांची इच्छा असते. व्हीआयपी नंबरप्लेटसाठी किंवा व्हीआयपी मोबाईल नंबर मिळवण्यासाठी अनेक लोक वाट्टेल ती किंमत मोजायला तयार असतात. मात्र यामुळे अनेकदा फसवणुकीचे प्रकार घडतात. अशीच एक घटना मीरा-भाईंदरमध्ये उघडकीस आली आहे. व्हीआयपी नंबरचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मीरा रोड येथील रहिवासी असलेल्या 26 वर्षीय तरुणाला सायबर क्राईम युनिटने अटक केली आहे. आरोपीने लोकांमध्ये असलेल्या व्हीआयपी नंबरच्या क्रेझचा गैरफायदा घेत आर्थिक फसवणूक केली. या माध्यमातून एका व्यक्तीला 64 हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे.

व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज करून द्यायचा ऑफर

अभिषेक तिवारी असे आरोपीचे नाव असून तो मिरा रोडच्या विजयनगर येथील रहिवासी आहे. आरोपीने व्हीआयपी मोबाईल नंबर मिळवून देण्याच्या आमिषाने पैसे लाटण्यासाठी व्हॉट्सअपचा आधार घेतला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचून अधिकाधिक लोकांना फसवण्याचा त्याचा कट होता. याच कारस्थानातून तो दररोज व्हॉट्सअप ग्रुपवर व्हीआयपी नंबर्सबाबतची जाहिरात आणि मेसेज पोस्ट करायचा. व्हॉट्सअप मॅसेज अनेकांपर्यंत पोहोचल्यामुळे त्यातील काही लोक त्याच्या आमिषाला फसायचे, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

एका व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांची कारवाई

फसवणूक झालेल्या घनश्याम सिंग या व्यक्तीने पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीच्या आधारे मीरा भाईंदर पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिटने कारवाई सुरू केली. तक्रारदाराला चार व्हीआयपी मोबाईल नंबर्स मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवण्यात आले होते. आरोपी अभिषेकने व्यक्तीला व्हीआयपी नंबरची सिमकार्ड्स दिली नाहीत. किंबहुना नंतर त्याने कुठलाही प्रतिसाद देणे टाळले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे घनश्यामच्या लक्षात आले आणि त्याने पोलिसात तक्रार दाखल केली.

हे सुद्धा वाचा

तक्रारदार घनश्यामचा मनी ट्रान्सफरचा व्यवसाय असून त्याने आरोपी अभिषेकच्या भूलथापांना बळी पडून वेगवेगळ्या डिजिटल अकाउंटमधून 64 हजार रुपये गमावले. याप्रकरणी क्राईम ब्रँच युनिट अधिक तपास करीत आहे. आरोपीने आणखी किती लोकांना गंडा घातला, याचा कसून तपास करण्यात येत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.