Video : सांगलीत आयपीएल बेटिंगच्या पैशाच्या वादातून दोन गटात तुफान राडा
मिरज शहरात आयपीएल बेटिंग पैश्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. या राड्या दरम्यान विश्वास धोंडीराम घोडके यांच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली आहे. घरावर दगड, विटा फेकून घरांच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच घराजवळ लावलेल्या एक बुलेटवर दगड घालून वाहनाचे नुकसान केले.
सांगली : मिरज शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू आहे. आयपीएल बेटिंग (Betting)च्या पैशाच्या वादातून दोन गटात तुफान राडा झाला आहे. यावेळी धारदार शस्त्रांनी घरावर हल्ला करत दगडफेक करण्यात आली. घराची तोडफोड करण्यात आली. यावेळी दोन्ही गट आमने-सामने आल्याने झालेल्या तुंबळ हाणामारी (Fighting)त तीन जण जखमी (Injured) झाले आहेत. विश्वास घोडके, लाईक इनामदार आणि जुबेर शरीकमसलात अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी 12 जणांच्या विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मिरज पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सांगलीत आयपीएल बेटिंगच्या पैशाच्या वादातून दोन गटात तुफान राडा#Sangli #IPLBetting #MoneyDispute #Fighting pic.twitter.com/eP0n0hXsuQ
हे सुद्धा वाचा— TV9 Marathi (@TV9Marathi) May 29, 2022
बेटिंग पैशाच्या वादातून हाणामारी
मिरज शहरात आयपीएल बेटिंग पैश्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. या राड्या दरम्यान विश्वास धोंडीराम घोडके यांच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली आहे. घरावर दगड, विटा फेकून घरांच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच घराजवळ लावलेल्या एक बुलेटवर दगड घालून वाहनाचे नुकसान केले. यावेळी झालेल्या हाणामारीत विश्वास घोडके, लाईक इनामदार आणि जुबेर शरीकमसलात हे तिघेजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान या प्रकरणी घोडके आणि इनामदार या दोन्ही गटाकडून मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. दोन्ही गटातील 12 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. तर याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे मिरज शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. (Free style fighting in two groups over IPL betting money dispute in Sangli)