दारू दिली नाही म्हणून मित्रानेच चिरला मित्राचा गळा; आरोपीला अटक, इचलकरंजीमधील धक्कादायक घटना

इचलकरंजी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मित्रानेच मित्रावर प्राणघातक हल्ला केला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. दारू देण्यास नकार दिल्याने आरोपीने रागाच्या भरात धारदार कटरने आपल्याच मित्रावर हल्ला केला.

दारू दिली नाही म्हणून मित्रानेच चिरला मित्राचा गळा; आरोपीला अटक, इचलकरंजीमधील धक्कादायक घटना
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 9:18 AM

कोल्हापूर : इचलकरंजी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मित्रानेच मित्रावर प्राणघातक हल्ला केला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. दारू देण्यास नकार दिल्याने आरोपीने रागाच्या भरात धारदार कटरने आपल्याच मित्रावर हल्ला केला. सूरज संजय बागडे ( वय 33, रा. भाटले मळा, शहापूर) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला तब्यात घेण्यात आले आहे.

आरोपीला अटक

पोलिसांनी घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार सूरज बागडे आणि आरोपी प्रकाश गुरव (वय62) हे दोघे मित्र आहेत. ते शहरातील एका हातमागावर काम करतात. दोघेही दारू पित असल्याने त्यांची ओळख झाली. प्रकाश हा सूरजकडे दारूसाठी वारंवार पैशांची मागणी करत असे. यातून त्यांच्यामध्ये अनेकदा वाद देखील होत असत. दरम्यान ते कामावरून परतताना पेट्रोल पंपाशेजारी दारू प्यायला बसले होते. दारूवरून त्यांच्यात वाद झाला. सूरजने दारू देण्यास नकार दिला. दारू दिली नाही म्हणून प्रकाश याला राग अनावर झाला आणि त्याने आपल्या जवळच्या कटरने सूरजचा गळा चिरला.

जखमीवर रुग्णालयात उपचार

दरम्यान या प्राणघातक हल्ल्यामध्ये सूरज हा गंभीर जखमी झाला आहे. त्याचा गळा चिरल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्याला उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रकाश गुरव ( वय 62 वर्ष रा. आभार फाटा, चांदूर) याला ताब्यात घेतले आहे. घटनेबाबत अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या 

Chain Snatching | पादचारी महिलांच्या सोनसाखळ्यांची चोरी, मुंबईत 32 वर्षीय जिम ट्रेनरला अटक

Video| भिवंडीत घराच्या समोर पार्क केलेली रिक्षा चोरीला, घटना सीसीटीव्हीत कैद

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात जेष्ठ नागरिकांना साडेपाच कोटींचा गंडा, जास्त परताव्याचं आमिष देत केली फसवणूक

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....