Ganesh Naik Video : तर माझ्या अन् माझ्या मुलाच्या जीवाला धोका, गणेश नाईकांवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ चर्चेत

माझ्या आणि माझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे, अशी भीती भाजप नेते गणेश नाईकांवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने केला आहे. त्यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. तसेच त्यांचा एक व्हिडीओही चर्चेत आहे.

Ganesh Naik Video : तर माझ्या अन् माझ्या मुलाच्या जीवाला धोका, गणेश नाईकांवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ चर्चेत
गणेश नाईकांकडून आपल्या जीवास धोका असल्याचा आरोप दीपा चौहान यांनी केला आहे.
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 3:54 PM

मुंबईः माझ्या आणि माझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे, अशी भीती भाजप नेते गणेश नाईकांवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने केला आहे. त्यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. तसेच त्यांचा एक व्हिडीओही चर्चेत आहे. ऐरोलीचे आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्याविरोधात नेरुळ पोलीस (Nerul Police) ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दीपा चौहान या महिलेने गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केलाय. त्यानंतर नाईक यांच्याविरोधात तसेच राज्य महिला आयोगाकडेही (State Women Commission) या महिलेने तक्रार केली आहे. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नाईकांच्या अटकेचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर आता नाईक यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. पोलिसांकडून नाईकांचा शोध सुरू आहे. नाईक यांचे घर, कार्यालय आणि मुरबाडमधील फार्म हाऊसवरही त्यांनी शोध घेतल्याची माहिती मिळतेय.

नाईकांवरील आरोप काय?

गणेश नाईक यांच्यावर दीपा चौहान यांनी गंभीर आरोप केलेत. गेली 27 वर्षे मी नाईक यांच्या संपर्कात आणि संबंधात होते. नाईक हे मला नुसते आश्वासन द्यायचे. आमच्या संबंधातून मला एक मुलगाही आहे. नाईकांनी मला आश्वासन दिले होते की, मुलगा पाच वर्षांचा झाल्यानंतर मी वडील म्हणून त्याला नाव देईन. मात्र, त्यांनी तसे केले नाही. नाईकांनी आम्हाला कोणतेच आर्थिक पाठबळ दिले नाही. नाईक यांच्यासोबत मी पूर्वी संबंधात होते. त्या संबंधातून मुलगा झाल्यानंतर त्यांनी माझ्यावर अनेकवेळा जबरदस्तीही केली. माझे लैंगिक शोषण केले, असा आरोप त्यांनी केलाय.

मुलाच्या जीवाला धोका…

भाजप आमदार गणेश नाईक यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय. गणेश नाईकांना अटकपूर्व जामीन भेटला, तर माझ्या आणि माझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे. ते माझे अपहरणकरून माझ्याकडून काहीही लिहून घेऊ शकतात. यासाठी मला जनतेच्या सहकार्याची गरज असल्याची विनंती पीडित महिलेने व्हिडीओद्वारे केलीय.

नाईकांनी खरे सांगावे…

पीडित महिला म्हणतात की, एवढ्या मोठ्या नेत्यावर मी आरोप केले. आता त्यांनी समक्ष येऊन त्यांनी हे काय आणि कसे आहे ते सांगायला पाहिजे. त्यांनी भूतकाळात जे केले, ते जनतेसमोर येऊन समक्ष सांगितले पाहिजे. आता त्यांच्यावर अटकेचे वॉरंटही निघाले आहे. तर ते बेपत्ता आहेत. त्यामुळे त्यांनी पुढे यावे आणि काय ते सांगावे. मला माझ्या मुलाला न्याय हवा आहे. त्यासाठी माझा लढा सुरू आहे. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.