सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न, गुन्हे शाखेकडून पाच आरोपींना बेड्या
आरोपींनी 16 फेब्रुवारीला पहाटेच्या वेळी वेळू येथील सेंट्रल बँक ऑफिस इंडियाच्या एटीएम मशीनच नुकसान करून, मशीन फोडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांची चोरी अयशस्वी ठरल्याने, त्यांनी तिथून चारचाकी गाडीतून पलायन केले होते.
पुणे / विनय जगताप (प्रतिनिधी) : पुणे सातारा महामार्गावरील वेळू गावच्या हद्दीतलं सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना चाकण येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. गेल्या आठवड्यात एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करत चोरट्यांना पकडण्यास यश मिळवले. सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत पोलिसांनी या पाच आरोपींना ताब्यात घेतलं. शुभम नागपुरे, प्रणित गोसावी, शुभम सरवदे, आकाश नागपुरे, कार्तिक गौपाले अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला
आरोपींनी 16 फेब्रुवारीला पहाटेच्या वेळी वेळू येथील सेंट्रल बँक ऑफिस इंडियाच्या एटीएम मशीनच नुकसान करून, मशीन फोडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांची चोरी अयशस्वी ठरल्याने, त्यांनी तिथून चारचाकी गाडीतून पलायन केले होते. याबाबतच्या गुन्ह्याची नोंद खेडशिवापूरच्या राजगड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती.
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांना पकडले
यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला. तपासादरम्यान आरोपी चाकण येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने चाकण येथे सापळा रचून या पाचही आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.