नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली गँगवॉरने (Delhi Gang War) हादरली आहे. दिल्लीतील रोहिणी कोर्टातच थरारक हत्याकांड झालं. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला, तर एक गँगस्टरही ठार झाला आहे. भर दुपारी आरोपींनी वकिलाचा वेश परिधान करुन कोर्टात प्रवेश करत गोळीबार केला होता.
फिल्मी स्टाईल हत्याकांडाने दिल्ली हादरली आहे. हल्लेखोरांनी मोस्ट वॉन्टेड गुंड जितेंद्र मान उर्फ गोगीची (Jitender Mann ‘Gogi’) गोळ्या घालून हत्या केली. त्या दरम्यान न्यायालयाच्या आवारात गोळीबाराचा थरार झाला. यावेळी हल्लेखोरही ठार झाले. या गोळीबारात आतापर्यंत चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक गँगस्टर जितेंद्र आहे, तर जितेंद्रवर हल्ला करण्यासाठी आलेल्या तीन हल्लेखोरांचाही समावेश आहे.
हल्लेखोर वकिलाच्या वेशात कोर्टात
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर वकिलांच्या रूपात न्यायालय परिसरात घुसले होते. त्यांनी गुंड जितेंद्रवर गोळीबार केला. स्पेशल सेलच्या टीमने जितेंद्रला कोर्ट रूममध्ये नेले होते. तिथे हा थरारक प्रसंग घडला.
दिल्लीच्या टिल्लू टोळीने जितेंद्रची हत्या केल्याचा संशय आहे. जे हल्लेखोर ठार झाले आहेत त्यातील एकाचं नाव राहुल आहे, ज्याच्यावर 50 हजारांचे बक्षीस होते. तर दुसराही वॉन्टेड गुंड होता.
कोण होता जितेंद्र गोगी?
गुंड जितेंद्रला दोन वर्षांपूर्वी गुरुग्राममधून स्पेशल सेलने अटक केली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या मते, जितेंद्र गोगीने गुन्हेगारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवली होती. जितेंद्र गोगीच्या नेटवर्कमध्ये 50 हून अधिक गुन्हेगार आहेत.
विशेष म्हणजे जितेंद्र गोगीला 2020 मध्ये गुरुग्राम येथून अटक करण्यात आली होती. गोगीसह कुलदीप फज्जाच्याही मुसक्या आवळल्या होत्या. 25 मार्च रोजी कुलदीप फज्जा कोठडीतून पळून गेला. फज्जा जीटीबी रुग्णालयातून पळून गेला होता त्यानंतर त्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला होता.
पाहा व्हिडीओ :
#WATCH | Visuals of the shootout at Delhi’s Rohini court today
As per Delhi Police, assailants opened fire at gangster Jitender Mann ‘Gogi’, who has died. Three attackers have also been shot dead by police. pic.twitter.com/dYgRjQGW7J
— ANI (@ANI) September 24, 2021
विक्की मिद्दूखेराची गोळी झाडून हत्या
दुसरीकडे, युवा अकाली दलाचा नेता विक्रमजीत सिंह उर्फ विक्की मिद्दूखेरा याची काही दिवसांपूर्वी भरदिवसा गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. कारमधून आलेल्या चौघा हल्लेखोरांनी पंजाबच्या मोहालीमधील मटोर येथे विक्कीची हत्या केली होती. बम्बिहा गँगने ही हत्या घडवून आणल्याचा संशय होता. त्यानंतर प्रतिस्पर्धी लॉरेन्स बिष्णोई टोळीचा गँगस्टर संपत नेहरा याने ‘तेरी मौत का बदला, एक के बदले चार मारके लेंगे’ अशी केलेली फेसबुक पोस्ट खळबळ उडवून देत होती.
विक्की मिद्दूखेराची हत्या
विक्की मिद्दूखेराच्या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला होता. विक्की प्रॉपर्टी सल्लागाराकडे गेला होता. यावेळी चौघा हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. विक्कीने तिथून पळ काढला, मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करुन हत्या केली. विक्कीच्या शरीरात बंदुकीच्या नऊ गोळ्या सापडल्या होत्या. राजकीय वर्चस्ववादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त झाला होता.
संबंधित बातम्या :
तेरी मौत का बदला, एक के बदले चार मारके लेंगे, युवा नेत्याच्या हत्येनंतर गँगस्टरचा इशारा
मैत्रिणीला भेटायला आला आणि अडकला, गँगस्टर सोनू पठाणला अटक, समीर वानखेडेंच्या पथकाची कारवाई
राखा को पकड कर दिखाओ, बिहारमधील एसपींना ओपन चॅलेंज, कुख्यात गँगस्टरला नागपूर पोलिसांनी पकडलं