AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 मुलांची आई असलेल्या गरोदर महिलेवर गँगरेप! रेल्वे स्टेशनवरच सामूहिक बलात्काराच्या घटनेनं खळबळ

पाच जणांचं कुटुंब रेल्वे स्थानकात आलेलं. पती पत्नी आणि तीन मुलं रेल्वेस्थानकात रात्री थांबली होती. त्यावेळी नशेत असलेल्या तिघांची नजर या कुटुंबावर पडली.

3 मुलांची आई असलेल्या गरोदर महिलेवर गँगरेप! रेल्वे स्टेशनवरच सामूहिक बलात्काराच्या घटनेनं खळबळ
खळबळजनक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 9:53 AM

तीन मुलांची आई असलेल्या एका गर्भवती महिलेसोबत (Pregnant Women) संतापजनक प्रकार घडला. या गर्भवती महिलेवर गँगरेप (Gang rape) करण्यात आला. रेल्वे स्थानकातच घडलेल्या या खळबळजनक घटनेनं तीव्र संताप व्यक्त केला जातोय. आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) ही घटना घडली. बापटला जिल्ह्यातील रेपल्ले रेल्वे स्थानकात शनिवारी रात्रीच्या सुमारात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री तिघांनी या महिलेसोबत लज्जास्पद कृत्य केलंय. रेपल्ले रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर एकवर एक कुटुंब ट्रेनची वाट पाहत थांबलं होतं. यावेळी तिघांनी संपूर्ण कुटुबांचं अपहरण केलं. त्यानंतर महिलेच्या पतीला जबर मारहाण केली. महिलेच्या पतीनं आरडाओरडा करुन मदत मागण्याचा प्रयत्नही केला. मात्र पोलिसांची कोणतीही मदत मिळाली नाही. शिवाय महिलाही जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात आता उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ज्यातील एक आरोपी अल्पवयीनं असल्याची माहिती समोर आली आहे. एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी रात्री उशिरा एक वाजण्याच्या सुमारास हा सगळा खळबळजनक प्रकार घडला. हे कुटुंब कामाच्या शोधात होतं. काम शोधण्यासाठी गुंटूरहून कृष्णा जिल्ह्याच्या दिशेने हे कुटुंब जाण्यासाठी रेल्वे स्थानकात आलं होतं.

संतापजनक!

पाच जणांचं कुटुंब रेल्वे स्थानकात आलेलं. पती पत्नी आणि तीन मुलं रेल्वेस्थानकात रात्री थांबली होती. त्यावेळी नशेत असलेल्या तिघांची नजर या कुटुंबावर पडली. सगळ्यात आधी नशेत असलेल्या नराधमांनी महिलेच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पत्नी पतीचा बचाव करण्यासाठी पुढे आली. म्हणून नराधमांनी पत्नीला रेल्वे स्थानकातून खेचून घेऊन गेले.

हे सुद्धा वाचा

रेपल्ले स्टेशन आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीपासून जवळपास 80 किलोमीटर लांब आहे. पीडित महिलेच्या पतीनं धावत जात पोलिसांची मदत मिळवण्याचाही प्रयत्न केला. पण त्याला कोणत्याच पोलिसाची मदत मिळू शकली नाही. एकही पोलीस अधिकारी मदतीसाठी पीडित महिलेच्या पतीला मिळू शकला नाही.

पीडित महिलेवर उपचार सुरु

या खळबळजनक घटनेनंतर आता पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. मात्र या घटनेनंतर संपूर्ण आंध्र प्रदेश हादरुन गेलं आहे. तर अनेकांनी या घटनेनंतर निदर्शनं केली असून आरोपींना तातडीनं कडक शिक्षा केली जावी, अशी मागणी जोर धरतेय. महिला आयोगाकडूनही सामूहिक बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून पोलिसांनाही तातडीनं योग्य ती पावलं उचलण्याचे निर्देश देण्यात आलेत.

परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस.
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन.
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय.
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश.
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या.
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार.
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?.
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश.
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल.