‘तुम्ही दोघं चांगले मित्र-मैत्रीण, माझ्या मुलीसोबत लग्न कर’, त्याने नकार देताच मायलेकीने तरुणाला जिवंत जाळलं
महिलांकडे आपण आदराने बघतो. महिलांना माया असते, त्यांच्या ममत्वाची भावना असते, असं आपण मानतो. पण काही महिला त्याला अपवाद असतात. कारण छत्तीसगडमध्ये एका महिलेने आपल्या मुलीसोबत जे कृत्य केलं आहे ते खरंच धक्कादायक आहे.
रायपूर : महिलांकडे आपण आदराने बघतो. महिलांना माया असते, त्यांच्या ममत्वाची भावना असते, असं आपण मानतो. पण काही महिला त्याला अपवाद असतात. कारण छत्तीसगडमध्ये एका महिलेने आपल्या मुलीसोबत जे कृत्य केलं आहे ते खरंच धक्कादायक आहे. दोन्ही मायलेकींनी एका तरुणाला घरी बोलावलं. त्याच्याजवळ लग्नाची मागणी घातली. पण त्याने नकार देताच त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याचा संताजनक प्रकार समोर आला आहे.
नेमकं काय घडलं?
छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यात ही भयानक घटना घडली आहे. बैकुंठपुरात मायलेकींनी मिळून एका तरुणाला जिवंत जाळलं आहे. संबंधित तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे महिला असूनही त्या इतक्या क्रूरपणे कसं वागू शकतात? असा सवाल स्थानिकांकडून विचारलं जातोय.
संबंधित घटना ही बैकुंठपूर येथील तलवापारा परिसरात 18 ऑगस्ट रोजी समोर आली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. आरोपी महिला आणि तिची मुलगी गेल्या 20 दिवसांपासून फरार होत्या. अखेर त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना आज यश आलं आहे.
नेमकं काय घडलं होतं?
मृतक तरुणाचं वेदप्रकाश असं नाव आहे. गेल्या महिन्यात 18 तारखेला तो गंभीर अवस्थेत तलवापारा परिसरात पोलिसांच्या हाती लागला होता. त्याला तातडीने बैकुंठपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी आणलं गेलं होतं. पण त्याची प्रकृती नाजूक असल्या कारणाने डॉक्टरांनी तरुणाला उपचारासाठी रायपूरला हलवण्याची सूचना केली होती. त्यानुसार तरुणाला रुग्णवाहिकेद्वारे कालडा बर्न हॉस्पिटलला आणलं गेलं होतं. पण 26 ऑगस्टला तरुणाची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अयशस्वी ठरली.
मृतकाने पोलिसांना उपचार सुरु असताना घटनेचा थरार सांगितला
मृतकावर उपचार सुरु असताना पोलिसांनी या घटनेची माहिती विचारली होती. तेव्हा त्याने सविस्तर घटनाक्रम पोलिसांना सांगितला होता. आरोपी 21 वर्षीय तरुणी पूजा प्रधान हिने तिच्या घरी बोलावलं. त्यावेळी तिची 40 वर्षीय आईदेखील घरात होती. त्यांनी तरुणाला पूजासोबत लग्नाचा हट्ट केला. तसेच लग्नासाठी दबाव टाकला. तसेत ब्लॅकमेल करत पैसे मागितले. पण तरुणाने त्यांना विरोध केला. याच गोष्टीचा राग मनात धरुन दोघी मायलेकींनी तरुणाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, असं तरुणाने पोलिसांना सांगितलं होतं. या घटनेत तरुण प्रचंड भाजला होता.
मायलेकी घटनेनंतर फरार, अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या
संबंधित घटनेनंतर आरोपी मायलेकी फरार होत्या. पोलीस त्यांच्या घरी चौकशीसाठी गेले तेव्हा त्यांच्या घराला टाळा होता. पोलीस त्यांचा शोध घेत होते. यादरम्यान काही लोकांनी त्यांना तलवापारा परिसरात बघितल्याची माहिती गुप्त बातमीदाराने पोलिसांना दिली. त्याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचत दोघी आरोपींच्या बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपी मायलेकींची चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.
हेही वाचा :