UP Crime : वाराणसीत बेकायदेशीर गर्भपातादरम्यान तरुणीचा मृ्त्यू, प्रियकराला अटक, डॉक्टर फरार

| Updated on: Aug 16, 2022 | 5:38 PM

सध्या तरुणीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोघांचा शोध सुरू आहे. चौघांविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

UP Crime : वाराणसीत बेकायदेशीर गर्भपातादरम्यान तरुणीचा मृ्त्यू, प्रियकराला अटक, डॉक्टर फरार
पंजाबमध्ये स्कूल बसवर तलवारीने हल्ला
Follow us on

उत्तर प्रदेश : बेकायदेशीर गर्भपात (Illegal Abortion) करताना एका 23 वर्षीय अविवाहित तरुणीचा मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील वाराणसीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या प्रियकरासह रुग्णालयाच्या संचालिकेला अटक (Arrest) केली असून, गर्भपात करणारा डॉक्टर आणि आरोपीचा मित्र फरार झाला आहे. प्रद्युमन यादव असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. प्रद्युमन बस चालक आहे. सध्या तरुणीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोघांचा शोध सुरू आहे. चौघांविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची गय केली जाणार नाही, असे वाराणसी ग्रामीणचे एसपी सूर्यकांत त्रिपाठी यांनी सांगितले.

तरुणी पाच महिन्यांची गर्भवती होती

पीडित तरुणी चोलापूर येथे तिच्या आजोबांच्या घरी शिक्षणासाठी राहत होती. यादरम्यान आरोपी प्रद्युमन यादवशी तिची ओळख झाली. या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. प्रेमसंबंधातून दोघांमध्ये अनेकदा शारिरीक संबंध झाले. यातून तरुणी पाच महिन्यांची गर्भवती राहिली. यानंतर रक्षाबंधनानिनित्त आपल्या घरी जाते सांगून तरुणी तिच्या घरी जाण्यासाठी आजोबांच्या घरुन निघाली. मात्र ती घरी न जाता आपला प्रियकर प्रद्युमनसोबत बेकायदेशीर गर्भपात करण्यासाठी वाराणसीतील गणेश लक्ष्मी रुग्णालयात पोहचली. तिथे गर्भपातादरम्यान काही वैद्यकीय अडचणी आल्याने तरुणीचा मृत्यू झाला.

दोघांना अटक, दोघे फरार

तरुणी घरी पोहचली नाही म्हणून तिच्या घरच्यांनी तिची चौकशी सुरु केली. चौकशीदरम्यान तिच्या पालकांना धक्कादायक माहिती मिळाली. प्रेमसंबंधातून मुलगी गरोदर राहिली आणि गर्भपातादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती तिच्या पालकांना कळाली. पालकांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तक्रारीची तात्काळ दखल घेत कारवाई सुरु केली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीचा प्रियकर प्रद्युमन यादवसह रुग्णालयाच्या संचालिकेला अटक केले. तर या प्रकरणी जोडप्याला मदत करणारा प्रद्युमनचा मित्र अनुराग चौबे आणि गर्भपात करणारा डॉ. ललन पटेल फरार झाला आहे. पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

याप्रकरणानंतर गणेश लक्ष्मी रुग्णालयात बेकायदेशीर गर्भपात होत असल्याचे निष्पन्न होत आहे. यामुळे रुग्णालय प्रशासनही पोलिसांच्या रडारवर आले आहे. रुग्णालयात किती बेकायदेशीर गर्भपात झाले, याबाबतही चौकशी करण्यात येत आहे. (Girl dies during illegal abortion in Varanasi, boyfriend arrested, doctor absconding)