‘ती’ दोन मुलांच्या आईच्या प्रेमात पडली, मुस्लिम महिलेसोबत लग्नासाठी हट्टाला पेटली

अल्पकाळातच दोघींची घट्ट मैत्री झाली. युवतीला ती मुस्लिम महिला आवडायची. लवकरच दोघींमध्ये अफेयर सुरु झालं. दोघे काही दिवस बोलले. नंतर परस्परांचे फोन नंबर एक्सचेंज केले.

'ती' दोन मुलांच्या आईच्या प्रेमात पडली, मुस्लिम महिलेसोबत लग्नासाठी हट्टाला पेटली
Love
Follow us
| Updated on: Mar 14, 2024 | 2:03 PM

नवी दिल्ली | 14 मार्च 2024 : दीड महिन्यापूर्वी अचानक एक युवती बेपत्ता झाली होती. पोलिसांनी तिला शोधून काढलं. नोएडा येथे ती सापडली. युवती एका विवाहित मुस्लिम महिलेसोबत लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. युवती पोलिसांना सापडली. पण तिने कुटुंबासोबत जाण्यास नकार दिला. मुस्लिम महिलेसोबत आपल्याला लग्न करायचय, यासाठी ती अडून बसली. बरेच प्रयत्न करुन या युवतीची समजूत काढली व तिला तिच्या कुटुंबीयांकडे सोपवलं. उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये ही मुलगी राहते.

एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मुस्लिम महिला बरेलीमध्ये रहायची. इन्स्टाग्रामवर तिची हाथरसमध्ये राहणाऱ्या मुलीबरोबर ओळख झाली. दोघे काही दिवस बोलले. नंतर परस्परांचे फोन नंबर एक्सचेंज केले. फोनवरती दोघी बोलायच्या. मुस्लिम महिलेने सांगितलं की, “तिचा नवरा तिला रोज मारहाण करतो. म्हणून मी माझ्या दोन मुलांसोबत वेगळी राहते”

कसं सुरु झालं अफेअर?

अल्पकाळातच दोघींची घट्ट मैत्री झाली. युवतीला ती मुस्लिम महिला आवडायची. लवकरच दोघींमध्ये अफेयर सुरु झालं. दोघींना माहित होतं की, समाज आपल्याला एकत्र राहू देणार नाही. म्हणून हाथरसमध्ये राहणारी मुलगी दीड महिन्यापूर्वी घरी न सांगताच नोएडाला निघून आली. मुस्लिम महिला आपल्या मुलांसोबत आधीपासूनच इथे रहायची. दोघी एकत्र राहू लागल्या.

दोघांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं

युवतीच्या कुटुंबीयांनी हाथरस पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला. टेक्निकल सर्विलांसच्या मदतीने पोलिसांनी युवतीला शोधून काढलं. बुधवारी पोलिसांनी मुस्लिम महिलेच्या घरातून युवतीला ताब्यात घेतलं. दोघांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. युवतीचे नातेवाईक तिथे पोहोचले होते. त्यांनी युवतीला सोबत घरी येण्यास सांगितलं. पण तिने नकार दिला. तिने म्हटलं की, माझ या मुस्लिम महिलेवर प्रेम आहे. मला तिच्यासोबत लग्न करायचय.

दोघीपण हट्टाला पेटल्या

माझं सुद्धा तितकच प्रेम आहे, असं मुस्लिम महिलेने सांगितलं. नवऱ्याकडून मला कधीच प्रेम मिळालं नाही, ते मला या मुलीकडून मिळतय असं तिने सांगितलं. दोघीही लग्न करण्यासाठी हट्टाला पेटल्या. तेव्हा पोलिसांनी दोघींना भरपूर समजावलं. बराचवेळ समजावल्यानंतर अखेर युवतीला तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.