मान शरमेने झुकली, सख्ख्या बापचं घाणेरडं कृत्य; न्यायालयाने मुलीला मिळवून दिला न्याय…
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांनी लेकीसोबतच क्रूर कृत्य केले. त्यानंतर मुलीने पोलिसात धाव घेतली.

सर्वांना हादरवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. एका तरुणीवर वडिलांनीच बलात्कार केला आहे. आता ती मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले आहे. या मुलीने वडिलांविरोधात पोलिसात तक्रार केली. वडिलांविरुद्धची ही कायदेशीर लढाई मुलीने जिंकली आहे. तसेच तरुणीला एका शाळेत नोकरी देखील मिळाली आहे. तिने तिच्या पसंतीच्या तरुणाशी लग्न केले.
हैदराबादमधील या मुलीवर बालपणी अनेक वेळा बलात्कार झाला आणि वयाच्या १७ व्या वर्षी ती गर्भवती राहिली. त्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले. तिची आई ती लहान असतानाच सोडून गेली होती. ती आणि तिचा धाकटा भाऊ वडिलांसोबत राहात होते. वडिलांकडून लैंगिक शोषणाचा बळी ठरलेल्या तिच्या धाकट्या भावाच्या आणि सावत्र बहिणीच्या पाठिंब्याने, या तरुणीने कुटुंबाच्या दबावाला न जुमानता २०२३ मध्ये गुन्हा दाखल झाला तेव्हा मुलगी १७ वर्षांची होती, तिची सावत्र बहीण १५ वर्षांची होती आणि तिचा भाऊ १४ वर्षांचा होता.
मुलीने तक्रार केल्यानंतर वडिलांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्यांनी त्यांची मुलगी प्रियकरामुळे गर्भवती असल्याचे म्हटले. त्यांनी न्यायालयात सांगितले की, मुलीला घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम चोरण्याची सवय होती आणि जेव्हा तिला फटकारण्यात आले तेव्हा तिने त्यांच्या विरोधात तक्रार दाख केली. तिच्या वडिलांनी असाही दावा केला की तक्रारीनंतरही मुलगी दोन वेळा तरुंगात भेटायला आली होती. जर तिला त्रास झाला असता तर ती भेटायला आली नसती. त्यांनी सांगितले की मुलीने काही शुल्लक पैशांसाठी लॅपटॉप विकला होता. त्यावर न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की मुलीला मदत करण्यासाठी कोणीही नव्हते. तिच्याकडे पर्याय नव्हता. दबावाखाली, जेव्हा तिच्या वडिलांनी तिला फोन केला तेव्हा ती तुरुंगात त्यांना भेटण्यासाठी गेली होती.
या प्रकरणात न्यायालयाने म्हटले आहे की, “फक्त याच कारणांमुळे, आपण असे म्हणू शकत नाही की तिने तुरुंगात तिच्या वडिलांना भेटून काही चुकीचे केले आहे आणि तिच्या वडिलांनी कोणताही गुन्हा केलेला नाही हे सिद्ध होत नाही.”
जन्मठेपेची शिक्षा ठोठावली
दोषीने त्याच्या इतर दोन मुलांच्या साक्षीलाही आव्हान दिले. त्याने सांगितले की तिच्या मोठ्या बहिणीच्या विनंतीवरून तिने साक्ष दिली आहे. न्यायालयाने त्याचे म्हणणे आणि त्याच्या विधानांशी संबंधित परिस्थितीजन्य पुरावे तपासल्यानंतर वडील खोटो बोलत असल्याचे सिद्ध झाले. न्यायालयाने ४ एप्रिल रोजी आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.