आधी खंडणीचा गुन्हा, नंतर पत्नीची कौटुंबिक छळाची तक्रार, आता एका तरुणीचा बलात्काराचा आरोप, अक्षय बोऱ्हाडेचा पाय आणखी खोलात

जुन्नर येथील सामाजिक कार्यकर्ता आणि शिवऋण संस्थेचा संस्थापक अध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे याच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहेत. कारण त्याच्याविरोधात आज (6 सप्टेंबर) नव्याने आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आधी खंडणीचा गुन्हा, नंतर पत्नीची कौटुंबिक छळाची तक्रार, आता एका तरुणीचा बलात्काराचा आरोप, अक्षय बोऱ्हाडेचा पाय आणखी खोलात
सामाजिक कार्यकर्ता अक्षय बोऱ्हाडे
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 9:40 PM

जयवंत शिरतर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : जुन्नर येथील सामाजिक कार्यकर्ता आणि शिवऋण संस्थेचा संस्थापक अध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे याच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहेत. कारण त्याच्याविरोधात आज (6 सप्टेंबर) नव्याने आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तरुणीने अक्षय विरोधात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी तिने जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अक्षय बोऱ्हाडेच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे.

अक्षयवर अनेक गुन्हे दाखल

जुन्नरचे माजी नगरसेवक आणि शहा एचपी गॅस वितरक रुपेश शहा यांच्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अक्षय बोऱ्हाडे याच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर आली होती. हे प्रकरण ताजं असतानाच अक्षय बोऱ्हाडेच्या पत्नी रुपाली बोऱ्हाडे यांनी पतीवर कौटुंबिक छळाचा गंभीर आरोप केले. त्यानंतर आता आणखी एका तरुणीने अक्षय विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे अक्षयच्या पत्नीने प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अक्षयने इतर मुलींची फसवणूक केल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता एका मुलीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.

अक्षयच्या पत्नीचे नेमके आरोप काय?

अक्षय, त्याची आई सविता बोऱ्हाडे, दीर अनिकेत बोऱ्हाडे यांनी आपला प्रचंड छळ केल्याचा आरोप रुपाली बोऱ्हाडे यांनी केला आहे. सासरच्यांनी हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच वेळोवेळी रिव्हॉल्वर आणि गुंडांचा धाक दाखवून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. कोणतेही काम न करता शिवऋण संस्थेतून आलेल्या निधीचा वापर स्वत:च्या चैनीसाठी केला. तसेच वेगवेगळ्या मुलींसोबत अनैकतिक संबंध ठेवत फसवणूक केली, असा आरोप त्यांनी केला आहे.

जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रुपाली बोऱ्हाडे यांनी पती अक्षय आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन कलम 498 (अ) , 420,406,324,323,504,506, 34 शस्त्र आधिनियम 25 (अ) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

अक्षयसोबत सोशल मीडियावर मैत्री

रुपाली यांनी जुन्नरच्या एका स्थानिक पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अक्षयसोबत आपली पहिली भेट कधी झाली तेव्हापासून ते आतापर्यंतच्या सविस्तर घडामोडी सांगितल्या आहेत. रुपाली यांची अक्षयसोबत चर्चा वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट झाली होती. त्यावेळी रुपाली या कल्याणमध्ये एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होत्या. अक्षय यानेच आपल्याला लग्नाची मागणी घातलेली, असंही रुपाली यांनी या मुलाखतीत सांगितलं.

अक्षय बोऱ्हाडे रस्त्यावरील किंवा फुटपाथवरील अपंगाची सेवा करतो, असं आपल्याला सोशल मीडियाद्वारे विविध व्हिडीओंमधून समजलं. कल्याण रेल्वे स्थानकावर एक अपंग महिला आपण बघितली. त्याबाबत आपण फेसबुकद्वारे अक्षयसोबत संपर्क करुन माहिती दिली. त्यावेळी अक्षयने कल्याणला जेव्हा येऊ तेव्हा त्यांना घेऊन जाऊ, असं सांगितलं. याच मुद्द्यावरुन एकमेकांचे व्हाट्सअॅप नंबर शेअर करण्यात आले. त्यातून दोघांमध्ये बातचित सुरु झाली आणि काही दिवसांनी अक्षयने आपल्याला प्रपोज केलं, असं रुपाली यांनी सांगितलं आहे.

‘काही रुग्णांना रात्रीच्या वेळी घेऊन जायचा’

“काही लोकं जागेवर घाण करतात, ज्यांना गंभीर आजार आहे किंवा ते दुसऱ्यांना मारहाण करतात अशा लोकांना अक्षय हा रात्रीचा घेऊन जायचा. त्यानंतर तो त्यांना कुठेही सोडायचा. तो त्यांना कुठे सोडायचा हे माहिती नाही. माझ्यासोबत अन्याय झालाच. पण तो छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन लोकांना फसवतोय. तो जे बोलतो त्याच्यावर विश्वास न ठेवता खरी सत्यता काय ते तपासावं. मी पोलिसात याबाबत तक्रार केलीय. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही”, असं देखील रुपाली म्हणाल्या.

हेही वाचा :

पुण्यात 13 वर्षीय मुलीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार, 8 जणांना बेड्या, महाराष्ट्राला हादरवणारी घटना

वेदनादायी आणि प्रचंड क्रूर, प्रेमविवाह, लग्नानंतर भांडणं, मुंब्राच्या फ्लॅटमध्ये बेशुद्ध पत्नीच्या तोंडात LPG पाईप खुपसला

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.