भारतातील अपहरणाची ‘ती’ भयानक घटना ज्याने संपूर्ण देश हादरला होता

देशातील आतापर्यंतची घडललेली सर्वात क्रूर घटना कोणती असेल? असा विचार केला तर आपल्या डोळ्यांसमोर कदाचित दिल्लीचं निर्भया बलात्कार प्रकरण लक्षात येऊ शकतं.

भारतातील अपहरणाची 'ती' भयानक घटना ज्याने संपूर्ण देश हादरला होता
गीता आणि संजय चोप्रा दोघं भाऊ-बहीण यांचा फोटो
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 3:42 PM

मुंबई : देशातील आतापर्यंतची घडललेली सर्वात क्रूर घटना कोणती असेल? असा विचार केला तर आपल्या डोळ्यांसमोर कदाचित दिल्लीचं निर्भया बलात्कार प्रकरण लक्षात येऊ शकतं. अर्थात ते प्रकरण खरंच खूप भीषण आणि भयानक होतंच. पण त्याआधी देखील एक प्रचंड भयानक प्रकरण समोर आलं होतं. ती घटना देखील दिल्लीतच घडली होती. पण घटनेचे पडसाद राजकारणापासून ते सामाजिक जीवनापर्यंत पडताना दिसले होते. संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणावरुन संसदेतही मोठा गदारोळ झाला होता. विशेष म्हणजे या प्रकरणावरुन तरुणांनी केलेल्या दगडफेकेत तत्कालीन मंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या डोक्याला दगड लागला होता. त्यात ते जखमी झाले होते.

नेमकं प्रकरण काय?

हे प्रकरण 1978 सालाचं आहे. एका नौदल अधिकाऱ्याच्या किशोरवयीन मुलगा आणि मुलीचं अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. आरोपींनी मुलीवर बलात्कार देखील केला होता. या घटनेवर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. याच घटनेवर त्यावेळचं मोरारजी देसाई सरकारही संकटात आलं होतं. कारण या प्रकरणावरुन सरकारवर विरोधकांनी प्रचंड निशाणा साधला होता.

मुलं संध्याकाळी सहा वाजता घराबाहेर पडली

नौदल अधिकारी मदन मोहन चोप्रा यांची 16 वर्षीय मुलगी गीता आणि तिचा 14 वर्षांचा भाऊ संजय चोप्रा हे दोघं भाऊ-बहीण 26 ऑगस्ट 1978 रोजी संध्याकाळी सहा वाजता घरातून बाहेर पडले होते. ते रात्री आठ वाजता आकाशवाणीच्या एका कार्यक्रमात सहभागी होणार होते. त्यामुळे ते आकाशवाणी केंद्राच्या दिशेला निघाले होते. पण त्यांच्या आई-वडिलांनी रात्री आठ वाजता रेडिओ सुरु केला तर त्यांच्या मुलांचा आवाज आला नाही. कदाचित ऐनवळी कार्यक्रम रद्द झाला असावा, असा त्यांचा अंदाज होता. कार्यक्रमानंतर मुलांचे वडील कॅप्टन मदन मोहन चोप्रा हे नऊ वाजता आकाशवाणी केंद्रावर गेले. पण तिथे गेल्यावर समजलं की त्यांचे मुलं तिथे पोहोचलेच नव्हते. त्यामुळे ऐनवेळी कार्यक्रमात बदल करण्यात आला होता. मदन मोहन चोप्रा यांनी मुलांच्या मित्रांच्या घरी जाऊन चौकशी केली. मात्र, तिथेही मुलं भेटली नाहीत. याशिवाय ते कुठे गेली असतील याचाही अंदाज लावता येत नव्हता.

पोलिसांची शोध मोहिम

मुलं घराबाहेर पडली. पण ते आकाशवाणी केंद्रावर पोहोचले नाहीत. याशिवाय ते त्यांच्या मैत्र-मेत्रिणींच्या घरीदेखील पोहोचले नाहीत. मग ती गेली कुठे? असा प्रश्न मुलांचे आई-वडिलांसह सगळ्यांनाच पडला होता. अखेर मुलांचे वडील मदन मोहान चौप्रा यांनी आपल्या नौदलातील इतर अधिकाऱ्यांच्या मदतीने पोलिसात तक्रार केली. त्यांनी नौदलातील इतर सहकाऱ्यांच्या मदतीने धौलाकुआं पोलीस ठाण्यात मुलांच्या अचानक हरवण्याबाबत तक्रार दिला होती. कॅप्टन चोप्रा यांनी रात्री दहा वाजेच्या सुमारास पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन केला. त्यानंतर पुढच्या दहा मिनिटात पोलिसांची एक गाडी चोप्रा यांच्या घरी पोहोचली. त्यानंतर कॅप्टन चोप्रा यांनी पोलिसांच्या मदतीने शहरातील सर्व हॉटेल, रुग्णालये, रेस्टॉरंट जाऊन चौकशी केली. विशेष म्हणजे भर रात्री जंगलात मोठ्या फौजफाट्यासह सर्च ऑपरेशन जारी करण्यात आलं. पण मुलं अखेर मिळाली नाहीत. अखेर संपूर्ण जंगल पिंचून काढल्यानंतरही मुलं मिळाली नाहीत म्हणून रात्री अडीच वाजता शोध मोहिम थांबवण्यात आली.

घटनेशी संबंधित पोलिसात दोन तक्रारी

या सर्व घडामोडी आपापल्या जागी घडत असताना दिल्ली पोलिसात दोन जणांच्या वेगवेगळ्या तक्रारीची नोंद करण्यात आली होती. या दोन्ही तक्रारी या किशोर वयातील एका मुलगा आणि मुलीशी संबंधित होती. या तक्रारी आणि चोप्रा भाऊ-बहिण यांच्या प्रकरणात साम्य असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. या पैकी पहिली तक्रार ही भगवान दास यांनी केली होती. दास यांचं हार्डवेअरचं दुकान होतं. ते 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास स्कुटरने जात असताना त्यांना बंगला साहब गुरुद्वार जवळ भरधाव वेगात एक फिएट कार जाताना दिसली होती. या कारमध्ये पुढे दोन माणसं आणि मागे किशोर वयातील मुलगा-मुलगी बसले होते. मागे बसलेली मुलगी ही जोरजोरात मदतीसाठी ओरडत होती. दास यांनी त्या गाडीचा नंबर नोंदवून घेतला. त्यांनी वेळेचा विलंब न करता तातडीने पोलीस कंट्रोल रुमला फोन करुन संबंधित प्रकार सांगितला. यावेळी त्यांनी MRK 8930 असा गाडीचा नंबर सांगितला.

तर एका 23 वर्षीय तरुणाने देखील याच घटनेविषयी संबंधित तक्रार राजिंदर नगर पोलीस ठाण्यात दिली होती. या तरुणाचं नाव इंद्रजित सिंह असं होतं. त्याने मुलगा आणि मुलीला कारमध्ये स्वत: बघितलं होतं. मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत होता. तर मुलगी ड्रायव्हिंग करणाऱ्या रोखण्याचा प्रयत्न करत होती. पण ड्रायव्हर एका हाताने गाडी चालवत होता. तर दुसऱ्या हाताने मुलीला मारहाण करत होता. पुढे ती गाडी सिग्नल तोडून पळून गेली. इंद्रजित यांनी सर्व माहिती पोलिसांना दिली. पण पोलिसांनी या प्रकरणाची फारशी दाखल घेतली नाही. त्यामुळे अखेर हे प्रकरण पेटल्यानंतर दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं.

तरीही गीता आणि संजय चोप्रा यांच्यासोबत नेमकं काय घडलं?

या सगळ्या घडामोडी घडत असताना गीता आणि संजय चोप्रा यांच्यासोबत नेमकं काय घडलं? हा प्रश्न अजूनही सुटलेला नव्हता. खरंतर घडलं काय होतं? तर गीता आणि संजय आकाशवाणी केंद्रात जाण्यासाठी घराबाहेर संध्याकाळी सहा वाजता पडले. ते रात्री आठ वाजेच्या कार्यक्रमात आकाशवाणीच्या कार्यक्रमात सहभागी होणार होते. त्यांनंतर त्यांचे वडील कॅप्टन चोप्रा त्यांना घ्यायला जाणार होते. गीता आणि संजय यांनी आकाशवाणीला जाण्यासाठी एका कारची लिफ्ट मागितली. तिथेच नेमका घोळ झाला. कारण ते लिफ्टसाठी ज्या फिएट गाडीत बसले त्या गाडीत होते सराईत गुन्हेगार रंगा आणि बिल्ला.

खरंतर मीडिया रिपोर्टनुसार, रंगा आणि बिल्ला यांना गीता आणि संजय यांची हत्या करायची नव्हती. त्यांना त्यांचं अपहरण करुन त्यांच्या आई-वडिलांकडून खंडणी मागायची होती. त्यानंतर त्यांना सोडून द्यायचं होतं. त्यांनी तसा प्रयोग त्याआधी मुंबईत केला होता. पण गीता आणि संजय यांचे वडील कॅप्टन मदन चोप्रा हे नौदलात अधिकारी असल्याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी दोघांची हत्या करण्याचं ठरवलं. त्यामुळे मुलं आणि रंगा-बिल्ला यांच्यात गाडीतच मोठी हाणामारी झाली. पण अखेर मुलं शेवटी कमी पडली. आरोपी रंगा-बिल्ला यांनी गीता हिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या केली. त्यामुळे हे प्रकरण जास्त हादरवणारं ठरलं.

घटनेनंतर तीन दिवसांनी मृतदेह मिळाले

संबंधित घटनेनंतर सलग तीन दिवस पोलिसांचा तपास सुरुच होता. गीता आणि संजय यांचा शोध सुरु होता. या दरम्यान एका जंगलाजवळ रस्त्यापासून काही अंतरावर गीता हिचा मृतदेह एका व्यक्तीला दिसला. तिथून काही अंतरावर तिचा भाऊ संजय याचा देखील मृतदेह आढळला. मृतदेह थोडे कुजलेल्या अवस्थेत होते. अखेर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी गीता आणि संजयच्या कुटुंबियांना ओळख पटवण्यासाठी बोलावलं. त्यानंतर ते मृतदेह त्यांचेच असल्याचं स्पष्ट झालं.

अखेर आरोपी सापडले, त्यांना फाशीची शिक्षा

अखेर हे प्रकरण प्रचंड तापलं. कारण मुलांची हत्या कुणी केली हे न उलगडणार गूढ होतं. पोलिसांपुढे अनेक आव्हानं होती. पोलिसांनी गाडीचे नंबर प्लेटपासून अनेक गोष्टी तपासल्या. अखेर ती गाडी पोलिसांच्या हाती लागली. फॉरेन्सिक टीमने सर्व योग्य तपास करत याच गाडीतून मुलांचं अपहरण झाल्याचं सांगितलं. या दरम्यान एक महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना फॉरेन्सिक टीमकडून मिळाले. गाडीतील फिंगरप्रिंट हे सराईत गुन्हेगार बिल्ला याच्याशी जुळतात. अखेर या प्रकरणात रंगा-बिल्लाचा हात असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी रंगा-बिल्लाला शोधण्यासाठी एक मोहिमच सुरु केली. अखेर 8 सप्टेंबर 1978 रोजी रंगा-बिल्ला एका ट्रेनमध्ये पकडले गेले. त्यांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. 31 जानेवारी 1982 रोजी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.

हेही वाचा : पतीने गळा पकडला, शिव्या देखील दिल्या! ‘बागबान’ फेम अभिनेत्री आरजू गोवित्रीकरने दाखल केला घटस्फोटाचा अर्ज

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.