Goa Rape Case | गोव्यातील नामांकित रेस्टॉरंटमध्ये परदेशी युवतीवर लैंगिक अत्याचार, दोघा कर्मचाऱ्यांना बेड्या

गोव्यात एका प्रसिद्ध उपहारगृहात नेपाळी युवतीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. रिकेश थापा आणि प्रधान या संशयित कर्मचार्‍यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Goa Rape Case | गोव्यातील नामांकित रेस्टॉरंटमध्ये परदेशी युवतीवर लैंगिक अत्याचार, दोघा कर्मचाऱ्यांना बेड्या
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 11:24 AM

पणजी : नेपाळी युवतीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार गोव्यातील एका नामांकित रेस्टॉरंटमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी पणजी महिला पोलिसांनी रेस्टॉरंटच्या दोघा कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. पीडिता आपल्या मैत्रिणींसोबत गोव्याला फिरायला आली होती.

काय आहे प्रकरण?

गोव्यात वाडी शिवोली भागात असलेल्या एका प्रसिद्ध उपहारगृहात नेपाळी युवतीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. कर्मचारी रिकेश थापा (वय 30 वर्ष) आणि प्रधान (वय 30 वर्ष, दोघेही मूळ रा. नेपाळ) या संशयित कर्मचार्‍यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. स्थानिक पोलिसांनी रस न दाखवल्यामुळे दिल्लीतील सामाजिक संस्थेमार्फत महिला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हॉटेल कर्मचाऱ्यांची पीडितेशी जवळीक

शनिवार मध्यरात्र ते रविवारी पहाटे दोन वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. पीडित युवती आपल्या दिल्लीस्थित दोघा मैत्रिणींसोबत गोव्याला आली होती. शनिवार 18 डिसेंबरच्या रात्री त्या तिघीही वाडी शिवोली येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्या होत्या.

यावेळी दोघाही संशयितांनी पीडितेशी जवळीक साधली. तिला गुंगीचे औषधमिश्रीत पेय पाजले. बेशुद्ध झाल्यावर संशयितांनी तिला रेस्टॉरंटच्या बाजूला नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. दोघांनी तिच्या शरीरावर गंभीर जखमाही केल्या आहेत.

स्थानिक पोलिसांनी दखल न घेतल्याचा आरोप

हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पीडितेच्या मैत्रिणींनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांनी दिल्लीमधील सामाजिक संस्थेशी संपर्क साधला. त्या संस्थेने वास्कोस्थित सामाजिक संस्थेशी संपर्क साधला. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पणजी महिला पोलिसांत तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या आधारे महिला पोलीस स्थानकाने संशयितांविरुद्ध भा.दं.सं.च्या 376, 328, 354 आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला. संशयितांना अटक केली. म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयाने संशयितांना सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक संध्या गुप्ता करत आहेत.

संबंधित बातम्या :

प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी मुलाच्या अपहरणाचा बनाव, मुंबईत विवाहितेला अटक

21 वर्षीय नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार, शाळेतल्या मित्रासह तिघांकडून अत्याचार

40 वर्षीय माजी नगराध्यक्षा राहत्या घरात मृतावस्थेत, अहमदनगरमध्ये खळबळ

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.