Sonali Phogat : त्याच बाथरुममध्ये ड्रग्स सापडले, क्लबच्या मालकाच्या मुसक्याही आवळल्या; सोनालीच्या मृत्यूचे गूढ उकलणार?

Sonali Phogat : पोलिसांच्या मते सोनालीच्या मृत्यूमागे आर्थिक कारणही असू शकतं. या प्रकरणी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांना अटक करण्यात आली आहे. पुरावे नष्ट केले जाऊ नये आणि साक्षीदारांवर दोघांनी दबाव आणू नये म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Sonali Phogat : त्याच बाथरुममध्ये ड्रग्स सापडले, क्लबच्या मालकाच्या मुसक्याही आवळल्या; सोनालीच्या मृत्यूचे गूढ उकलणार?
सोनाली फोगाट ज्या बाथरुममध्ये गेलेली तिथेच ड्रग्स सापडले; क्लबच्या मालकाच्या मुसक्या आवळल्याImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 11:52 AM

पणजी : प्रसिद्ध टिकटॉक स्टार सोनाली फोगाट (Sonali Phogat) हिच्या मृत्यूप्रकरणी आता नवी अपडेट समोर आली आहे. सोनालीच्या मृत्यूप्रकरणी गोव्यातील (Goa Police) अंजुना समुद्र किनारी असलेल्या कर्लिस रेस्टॉरंटच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. तसेच या मालकाच्या कर्लिस रेस्टॉरंटमधील बाथरुममध्ये ड्रग्स आढळून आलं आहे. विशेष म्हणजे सोनाली फोगाट याच बाथरुममध्ये गेली होती. तिथेच मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सापडल्याने खळबळ उडाली आहे.. याशिवाय एका ड्रग्ज (Drugs) पेडलरलाही अटक करण्यात आली आहे. सोनालीचा अचानक मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं आधी सांगितलं जात होतं. त्यानंतर तिचा पीए सुधीर सांगवानवर संशय व्यक्त केला गेला. आता हे संपूर्ण प्रकरण ड्रग्स थिअरीचं असल्याचं आढळून आलं आहे.

सोनाली फोगाटला तिच्या सहकाऱ्यांनी जबरदस्तीने एमडीएमए ड्रग्स दिले होते, असा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी सुधीरला ड्रग्स देणाऱ्या एका ड्रग्स पेडलरची ओळख पटवण्यात पोलिसांना यशही आलं आहे. सुधीरने गोव्यात राहणाऱ्या एका ड्रग्स पेडलरकडून ड्रग्स घेतले होते. आता या ड्रग्स पेडलरच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. सुधीर सांगवान आधीपासूनच या पेडलरच्या संपर्कात होता, असं सांगितलं जातं. सोनाली फोगाटच्या मृत्यूप्रकरणी आतापर्यंत चार लोकांना अटक करण्यात आली आहे. सुधीर सांगवान, सुखविंदर सिंग, कर्लीचा मालक आणि एका ड्रग पेडलरचा यात समावेश आहे.

शीतपेयातून मादक पदार्थ दिले

सोनालीचा भाऊ रिंकू ढाका याने अंजुना पोलीस ठाण्यात सुनीताचे दोन सहकारी सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी यांच्या विरोधात बुधवारी तक्रार दाखल केली होती. सोनालीच्या शीतपेयात तिच्या दोन सहकाऱ्यांनी मादक पदार्थ मिक्स केले होते. त्यामुळेच सोनालीचा मृत्यू झाला असावा असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे. सोनालीच्या मृत्यू मागचं खरं कारण बाहेर येण्यासाठी सखोल चौकशीची गरज असल्याचं सोनालीच्या भावाने म्हटलं होतं. सुधीर सांगवानचं वागणं योग्य नाही. तो पक्ष कार्यकर्त्यांना सोनालीला भेटू देत नसल्याच्याही तक्रारी होत्या, असंही त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

आरोपींची कबुली

पोलिसांच्या मते सोनालीच्या मृत्यूमागे आर्थिक कारणही असू शकतं. या प्रकरणी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांना अटक करण्यात आली आहे. पुरावे नष्ट केले जाऊ नये आणि साक्षीदारांवर दोघांनी दबाव आणू नये म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे. सोनालीच्या शीतपेयात मादक पदार्थ मिसळताना या दोघांना पाहण्यात आले होते. दोघेही 22 ऑगस्ट रोजी सोनालीसोबत गोव्याला गेले होते. या दोन्ही आरोपींनी सोनालीला मादक पदार्थ दिल्याची कबुलीही दिल्याचा दावा पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिश्नोई यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.