Solapur : सोलापुरातील जवानाला उत्तराखंडमध्ये वीरमरण, लष्कराचे वाहन दरीत कोसळले

या घटनेने सोलापूर करांच्या डोळ्यात पाणी उभा राहिलं आहे. त्यांच्या कुटुंबियांचा कंठही दाटला आहे. कारण उत्तराखंड येथे लष्कराच्या ताफ्यातील वाहन दरीमध्ये कोसळून झालेल्या अपघातामध्ये जवान गोरख चव्हाण (Gorakh Chavan Death) यांना वीरमरण आलेय.

Solapur : सोलापुरातील जवानाला उत्तराखंडमध्ये वीरमरण, लष्कराचे वाहन दरीत कोसळले
सोलापुरातील जवानाला उत्तराखंडमध्ये वीरमरणImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 7:41 PM

सोलापूर : सोलापूर जिल्हा आणि संबंध देशाच्या मनाला चटका लावून जाणारी एक घटना उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) घडलीय. कारण उत्तर घंडमधील एका अपघातात (Accident) सोलापूर आणि महाराष्ट्राने आपला सुपुत्र गमावला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने सोलापूर करांच्या डोळ्यात पाणी उभा राहिलं आहे. त्यांच्या कुटुंबियांचा कंठही दाटला आहे. कारण उत्तराखंड येथे लष्कराच्या ताफ्यातील वाहन दरीमध्ये कोसळून झालेल्या अपघातामध्ये जवान गोरख चव्हाण (Gorakh Chavan Death) यांना वीरमरण आलेय. जवान गोरख चव्हाण हे बार्शी तालुक्यातील रातंजन येथील रहिवासी आहेत. ह्या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे. गोरख चव्हाण हे बॉर्डर रोड ऑर्गनायजेशन मध्ये चालक या पदावर कार्यरत होते. हा अपघात आज आपल्या सर्वांवर काळ बनून कसोळला आहे.

अपघाताच्या घटना वाढल्या

उत्तराखंडमध्ये सैन्याच्या ताफ्यातील गाडी दरीत कोसळली अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. जवान गोरख चव्हाण हे गेल्या बारा वर्षांपासून बॉर्डर रोड ऑर्गनायजेशन मध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई – वडील ,पत्नी, 8 वर्षाचा मुलगा, 5 वर्षाची मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने रांतजण सह बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यात सीमेवर विविध पदावर कार्यरत असलेले तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अलिकडे घडणाऱ्या अशा घटना महाराष्ट्राची चिंता दिवसेंदिवस वाढवत आहे. याच्यावर बुधवारी शासकीय इतमामात रांतजन गावी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती देण्यात आलीय.

महाराष्ट्रच्या डोळ्यात पाणी आणणारी घटना

आपल्या महाराष्ट्राला सैनिकांची एक मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून जवान लष्करात भरती होतात. काही जिल्ह्यांना तर आपल्याकडे सैनिकांचे जिल्हे म्हणून ओळखले जाते. देशसेवेसाठी अनेक जवान पुढकार घेतात. त्यामुळे महाराष्ट्राची मान देशपातळीवर उंचावते. मात्र अशी घटना मनला चटका लावून जाते. या घटनेने त्यांच्या कुटुंबियांवर तर काळाचा डोंगर कोसळलाच आहे. मात्र संपूर्ण परिवारावर सध्या शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबियांना आत्ता आधाराची गरज आहे.

Achalpur Violence : अचलपूर दंगलीप्रकरणी आरोपींचा कोठडी मुक्काम 3 दिवसांनी वाढला, परिसरात नवे नियम

Buldhana Accident : बुलढाण्यात मलकापूरजवळ भीषण अपघात, 3 ठार एक गंभीर

Pune Protest : पुण्यात कात्रज पाणी प्रश्न पेटला, आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.