Gram buying center : नंदुरबार जिल्ह्यात नाफेडच्यावतीने हरभरा खरेदी केंद्र सुरू
मागच्या काही दिवसात अवकाळी पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. शेतीचं आतोनात नुकसान झाल्याचं शेतकरी सांगत आहेत. शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी महसूल अधिकाऱ्यांनी आणि काही मंत्र्यांनी केली आहे.
जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात नाफेडच्यावतीने हरभरा खरेदी केंद्र (Gram buying center) सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी नाव नोंदणीही करण्यात येत असून, हरभरा खरेदीसाठी नंदुरबार आणि शहादा अशी दोन केंद्र ठेवण्यात आली आहेत. नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत आहे. शहादा (shahada) खरेदी केंद्रावर 622 तर नंदुरबारच्या खरेदी केंद्रावर अवघ्या 22 शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केल्याचं समोर आला आहे. बाजार समितीत शासनाच्या हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडं हरभरा विक्रीस प्राधान्य देत आहे.
खासगी व्यापाऱ्यांना हरभरा विक्रीला प्राधान्य
राज्य शासनाच्यावतीने नाफेड मार्फेत हरभरा खरेदी सुरू झाली असली, तरी शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना हरभरा विक्रीस प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बाजार समिती बीकेव्हीटू या वाणाला सात हजार दोनशे ते सात हजार आठशेपर्यंत तर मेक्सिकन वाणाला दहा हजार रुपयापर्यंत दर मिळत आहे. गावरानी स्थानिक वाणाला चार हजार आठशे ते पाच हजार रुपयांपर्यंतचे दर मिळत आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिकेही टू या वाणाची लागवड होत असते आणि या वाणाला शासनाचा हमीभावापेक्षा जास्त दर आहे. नाफेडने हरभरा खरेदी केल्यानंतरही शेतकऱ्यांना हरभरा विक्रीच्या पैशासाठी आठ ते पंधरा दिवसाची प्रतीक्षा करावी लागते असा मागील वर्षाचा अनुभव असल्याने शेतकऱ्यांनी यावेळी खासगी व्यापाऱ्यांना हरभरा विक्रीला प्राधान्य दिल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
मागच्या काही दिवसात अवकाळी पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. शेतीचं आतोनात नुकसान झाल्याचं शेतकरी सांगत आहेत. शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी महसूल अधिकाऱ्यांनी आणि काही मंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे शेतकरी सरकारची काय मदत मिळणार याकडे डोळे लावून बसले आहेत. त्याचबरोबर राज्यात अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पीक काढण्याचं काम सुरु आहे.