Crime News : पॉर्नसाइट, न्यूड फोटो, असा जोडीदार नकोच, बायकोसोबत जे केलं ते खूपच धक्कादायक

Crime News : कारण जोडीदाराला ती आधीपासून ओळखत असते. पण काहीवेळा मोठ्या विश्वासाने ज्याला जन्मोजन्मीचा जोडीदार म्हणून निवडते, तोच दगा देतो. विशाल भावसार पत्नीसोबत जे वागलाय, ते खूपच धक्कादायक.

Crime News : पॉर्नसाइट, न्यूड फोटो, असा जोडीदार नकोच, बायकोसोबत जे केलं ते खूपच धक्कादायक
love dhoka
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 3:17 PM

अहमदाबाद : लग्नानंतर मुलगी मोठ्या विश्वासाने पतीच्या घरी येते. तिला आपलुकी, प्रेम आणि विश्वासाची अपेक्षा असते. लव्ह मॅरेज असेल, तर तिचा विश्वास जास्त असतो, कारण जोडीदाराला ती आधीपासून ओळखत असते. पण काहीवेळा मोठ्या विश्वासाने ज्याला जन्मोजन्मीचा जोडीदार म्हणून निवडते, तोच दगा देतो. असाच एक धक्कादायक प्रकार अहमदाबादमध्ये समोर आलाय. नरोदा पोलिसांनी विशाल भावसार नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे.

विशाल भावसार पत्नीसोबत जे वागलाय, ते खूपच धक्कादायक आहे. एखाद्याचा लग्नसंस्थेवरील विश्वास उडेल, अशी भयानक कृत्य केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

नवऱ्यावर आरोप काय?

पत्नीवर देह विक्रीसाठी जबरदस्ती केल्याचा, तिचे फोटो मॉर्फ करुन सोशल मीडिया, पॉर्न वेबसाइट्सवर पोस्ट केल्याचा गंभीर आरोप आहे. 18 मे रोजी नोंदवण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारावर त्याला अटक करण्यात आली. मारहाण, छळ, गुन्हेगारी कट आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यातंर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय,

दोघांची ओळख कुठे आणि कधी झाली?

तक्रारदार महिला आता उत्तर प्रदेशात आपल्या वडिलांच्याा घरी आहे. मुंबईत 2016 साली पहिल्यांदा ती विशाल भावसारला भेटली. ओळखीच रुपांतर पुढे प्रेमात झालं. 2018 मध्ये ती अहमदाबादला आली. तिने विशालसोबत लग्न केलं. विशाल भावसारला जुगार खेळण्याचा नाद होता. जेव्हा तो जुगारात हरुन यायचा, तेव्हा मला मारहाण करायचा, असं पत्नीने सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.

दुसऱ्या लोकांकडे पत्नीला पाठवायचा

2021 मध्ये विशाल भावसारला सट्टयामध्ये मोठ नुकसान झालं. त्यानंतर तो पत्नीवर देह विक्रीसाठी जबरदस्ती करत होता. पीडित महिलेने आधी त्याच ऐकण्यास नकार दिला. पण भावसाने पोटच्या मुलीला मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर नाईलाजाने पत्नीने त्याचं सगळ ऐकण्यास सुरुवात केली. विशाल भावसार त्याच्या मित्रांना आणि अन्य लोकांना घरी बोलवायचा व त्याच्या मनासारख करायला भाग पाडायचा. काहीवेळा दुसऱ्या लोकांकडे पाठवायचा. मी जेव्हा हे सर्व थांबवल, तेव्हा त्याने माझ्याकडून जबरदस्तीने घटस्फोटाच्या पेपरवर सही घेतली. पॉर्न साइटवर फोटोंसह पत्नीचा मोबाइल नंबर

नोव्हेंबरमध्ये घरातून बाहेर पडल्यानंतर दिल्लीला मी मैत्रिणीकडे राहत होती. नवरा मुलीचा ताबा माझ्याकडे द्यायला तयार नव्हता, अस पीडितेन सांगितलं. पीडित महिलेला नंतर समजलं की, नवऱ्याने तिच्या फोटोंचा वापर करुन मॉर्फिगच्या मदतीने न्यूड फोटो बनवले व त्याच्या मित्रांना पाठवले होते. पॉर्न साइटवर या फोटोंसह तिचा मोबाइल नंबरही अपलोड केला होता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.