Gujarat ATS | पुन्हा गुजरातमध्येच ड्रग्ज, ATS ची मोठी कारवाई, पाकिस्तानातून आलेले 600 कोटीचे ड्रग्ज जप्त, कनेक्शन काय?
गुजरात एटीएसने (Gujarat ATS) मोरबी जिल्ह्यात ड्रग्जच्या (Drugs) विरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी मलिया मियाना येथून 120 किलो ड्रग्ज जप्त केले आहे. या ड्रग्जची बाजारातील किंमत अंदाजे 600 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचे धागेदोरे पाकिस्तानातील ड्रग माफिया खालिद बख्शशी (Khalid Bakhsh) संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.
गांधीनगर : गुजरात एटीएसने (Gujarat ATS) मोरबी जिल्ह्यात ड्रग्जच्या (Drugs) विरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी मलिया मियाना येथून 120 किलो ड्रग्ज जप्त केले आहे. या ड्रग्जची बाजारातील किंमत अंदाजे 600 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचे धागेदोरे पाकिस्तानातील ड्रग माफिया खालिद बख्शशी (Khalid Bakhsh) संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानातूनच हे अंमली पदार्थ भारतात आणले जात असल्याची माहिती आहे.
ड्रग्जसोबतच पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणात बाहेर येत असलेल्या खालिद नावाच्या व्यक्तीचा संपर्क थेट जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी असल्याची माहिती आहे. भारतात पाठवण्यात आलेल्या या ड्रग्जच्या खेपेची पटकथा दुबईमध्ये लिहिण्यात आल्याचेही बोललं जात आहे. पाकिस्तानी ड्रग्ज माफिया खालिदने जब्बार आणि गुलाम नावाच्या दोन भारतीय तस्करांची दुबईतील सोमालिया कॅन्टीनमध्ये भेट घेतली होती. सध्या पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.
ATS apprehended three persons with 120 kg heroin worth Rs 600 crores. Preliminary investigation revealed that the consignment of heroin was brought by the accused via sea route where they had received a delivery from a Pakistani boat: DGP Ashish Bhatia pic.twitter.com/VQ4LEdfnQS
— ANI (@ANI) November 15, 2021
विशेष म्हणजे याआधीही पाकिस्तानी ड्रग माफिया खालिदने ड्रग्जची मोठी खेप भारतात पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. याच आठवड्यात गुजरातमधील पोलिसांनी देवभूमी द्वारका आणि सुरतमध्ये हेरॉइनसह अनेक अंमली पदार्थ जप्त केले आहेत. यावेळी तीन आरोपींनाही अटक करण्यात आली होती. देवभूमी द्वारका येथील ड्रग्ज पॅडलरकडून 88.25 कोटी रुपये किमतीचे 17 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
महाराष्ट्रातील जळगावातून 1500 किलो गांजा जप्त
राज्यात सध्या ड्रग्ज (Drugs) विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात आहेत. यादरम्यान आता मुंबई (Mumbai) एनसीबीच्या (NCB) पथकाने जळगावात (Jalgaon) एक मोठी कारवाई करत तब्बल 1500 किलो गांजा जप्त केला आहे. एनसीबीच्या पथाकाने यावेळी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरु आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रतील जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ एनसीबीच्या पथकाने तब्बल 1500 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी एनसीबीने दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आणला जात होता.
Ganja Seized In Jalgaon | मुंबई एनसीबीची मोठी कारवाई, जळगावातून 1500 किलो गांजा जप्तhttps://t.co/pxl9im5STN#CrimeNews #GanjaSeized #JalgaonCrimeNews #NCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 15, 2021
संबंधित बातम्या :