नव्वदीच्या वृद्धासह पत्नी राहत्या घरी मृतावस्थेत, उच्चभ्रू वस्तीमध्ये दुहेरी हत्याकांडाने खळबळ

सोसायटीत राहणारी एक वयोवृद्ध व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी आली, तेव्हा दोघं मृतावस्थेत आढळले. स्थानिक रहिवाशांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दाम्पत्याचं घर पाहिलं असता त्यांच्या कपाटाचं दार तोडलेलं दिसलं.

नव्वदीच्या वृद्धासह पत्नी राहत्या घरी मृतावस्थेत, उच्चभ्रू वस्तीमध्ये दुहेरी हत्याकांडाने खळबळ
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 12:37 PM

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद शहरात वयाची ऐशी पार केलेल्या वृद्ध दाम्पत्याची राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली. दरोड्याच्या उद्देशाने दोघा ज्येष्ठ नागरिकांचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आरोपींनी घरात घुसून पती-पत्नीचा जीव घेतला.

अहमदाबादमध्ये राहणारे वृद्ध दाम्पत्य

पोलिस उपायुक्त (झोन-1) रविंद्र पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार 90 वर्षीय दयानंद शानबाग आणि त्यांची 80 वर्षीय पत्नी विजयलक्ष्मी शानबाग हे घाटलोदिया परिसरातील पारसमणी सोसायटीतील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. शानबाग दाम्पत्याचा मुलगा आपल्या पत्नी-मुलांसह अहमदाबाद शहरातील दुसऱ्या भागात राहतो.

दरोड्याच्या उद्देशाने हत्येचा संशय

मंगळवारी रात्री सोसायटीत राहणारी एक वयोवृद्ध व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी आली, तेव्हा दोघं मृतावस्थेत आढळले. स्थानिक रहिवाशांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दाम्पत्याचं घर पाहिलं असता त्यांच्या कपाटाचं दार तोडलेलं दिसलं. खोलीतील सामानही अस्त्याव्यस्त पडलं होतं. त्यामुळे लुटीच्या उद्देशाने दोघांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पोलिसांनी अधिक तपासासाठी मयत दाम्पत्याच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलावलं. तपासासाठी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासलं जात आहे.

संबंधित बातम्या :

निर्घृण खुनाने नाशिक हादरले; चाकूचे 25 वार करून महिलेचा घेतला जीव

50 महिलांचे अश्लील व्हिडीओ, चष्मा ते चार्जर, स्पाय कॅममधून शूटिंग, कसा सापडला जाळ्यात?

हत्तीच्या नावे कोट्यवधींची संपत्ती दान करणाऱ्या तरुणाची आठ गोळ्या झाडून हत्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.