बुफेच्या रांगेत पदर पेटला, 54 वर्षीय विवाहितेचा होरपळून मृत्यू, फाईव्ह स्टार हॉटेलमधील प्रकार

साडीला आग लागून 54 वर्षीय महिला होरपळून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना अहमदाबाद शहरात घडली आहे. मणिनगरमधील गंगेश्वर सोसायटीत राहणाऱ्या रश्मिका शहा यांचा सोमवारी संध्याकाळी मृत्यू झाला.

बुफेच्या रांगेत पदर पेटला, 54 वर्षीय विवाहितेचा होरपळून मृत्यू, फाईव्ह स्टार हॉटेलमधील प्रकार
लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, आंध्र प्रदेशमध्ये कार-लॉरी अपघातात 9 ठार
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 12:46 PM

अहमदाबाद : फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये प्रजासत्ताक दिनी सुरु असलेला जल्लोष अचानक चित्कारांमध्ये पालटला. कारण बुफेच्या रांगेत उभ्या असलेल्या महिलेच्या साडीचा पदर पेटल्याने ती होरपळली होती. मात्र दुर्दैवाने सहा दिवसांच्या उपचारानंतर तिची प्राणज्योत मालवली. गुजरातमधील (Gujarat) अहमदाबाद शहरात 26 जानेवारीला ही घटना घडली होती. 54 वर्षीय रश्मिका शाह यांना या घटनेत प्राण गमवावे लागले. हॉटेल फोर पॉईंट्स बाय शेरेटॉन या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. रश्मिका यांचे पती उमेश शाह यांच्या फर्मने या ठिकाणी डिनरचे आयोजन केले होते. यावेळी आपल्या पतीसोबत उपस्थित असलेल्या रश्मिका यांच्या सिंथेटिक साडीचा पदर (Saree Caught Fire) पेटला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

काय आहे प्रकरण?

साडीला आग लागून 54 वर्षीय महिला होरपळून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना अहमदाबाद शहरात घडली आहे. मणिनगरमधील गंगेश्वर सोसायटीत राहणाऱ्या रश्मिका शहा यांचा सोमवारी संध्याकाळी मृत्यू झाला. 26 जानेवारी रोजी एलिसब्रिज येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये बुफेच्या रांगेत असताना रश्मिका यांच्या साडीने पेट घेतला होता. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

एलिसब्रिजचे इन्स्पेक्टर सुमित राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, रश्मिका त्यांचे पती उमेशसोबत शेरेटनच्या हॉटेल फोर पॉइंट्स येथे गेल्या होत्या. त्यांच्या पतीच्या फर्मने आयोजित केलेल्या डिनर पार्टीला त्या उपस्थित राहिल्या होत्या.

जेवण वाढताना पदर पेटला

“रश्मिका बुफे टेबलवर त्यांची प्लेट भरत होत्या, त्यावेळी त्याच्या सिंथेटिक साडीचा शेफिंग डिशच्या इंधनाला स्पर्श झाला आणि साडीला आग लागली. यामध्ये रश्मिका यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले” असे पोलीस निरीक्षक एच व्ही घेला यांनी सांगितले.

सहा दिवसांच्या उपचारानंतर निधन

रश्मिका यांच्या शरीराचा जवळपास 60 टक्के भाग भाजला होता. रुग्णालयात दाखल करत असतानाच त्यांची प्रकृती गंभीर होती. जवळपास सहा दिवस उपचार घेतल्यानंतर सोमवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हॉटेलमधील अग्निशामक सेवेबद्दल बोलताना घेला यांनी सांगितले की, रश्मिका यांना काही मिनिटांतच गंभीर दुखापत झाली. बँक्वेट हॉलमध्ये डिनर पार्टी सुरु होती. हॉटेल कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्या गंभीररित्या भाजल्या होत्या. या घटनेत हॉटेलमधील अन्य कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू जळाली नाही

याप्रकरणी एलिसब्रिज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हॉटेल संचालक मॅरियट इंटरनॅशनल ग्रुपच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न टाईम्स ऑफ इंडियाने केला, मात्र तो यशस्वी ठरला नाही.

संबंधित बातम्या :

तिसऱ्या नवऱ्याचा चारित्र्यावर संशय, एकनिष्ठता सिद्ध करण्यासाठी विवाहितेने दिरापासून झालेल्या मुलीला पेटवलं

पोलीस कर्मचाऱ्याच्या घरासमोरच होमगार्ड तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, नागपुरात उपचार

Satara Murder | चारित्र्याच्या संशयातून बायकोला पेटवलं, महाबळेश्वरमधील पतीला जन्मठेपेची शिक्षा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.