आई-बहिणीला इंजेक्शन देऊन संपवलं, आत्महत्येचा प्रयत्न करणारी 30 वर्षीय डॉक्टर बचावली

30 वर्षीय डॉ. दर्शना प्रजापतीने आपली आई मंजुळाबेन (59) आणि धाकटी बहीण फाल्गुनी (28) यांचा जीव घेतला. राहत्या घरी शनिवारी रात्री ड्रग्जचे इंजेक्शन दिल्याने रविवारी सकाळी दोघींचा मृत्यू झाला.

आई-बहिणीला इंजेक्शन देऊन संपवलं, आत्महत्येचा प्रयत्न करणारी 30 वर्षीय डॉक्टर बचावली
आई-बहिणीला इंजेक्शन देऊन डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 2:39 PM

गांधीनगर : 30 वर्षीय महिला डॉक्टरने आई आणि बहिणीची हत्या करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ड्रग्जचे इंजेक्शन देऊन आई आणि बहिणीचा जीव घेतल्यानंतर महिला डॉक्टरनेही झोपेच्या गोळ्या घेतल्या, मात्र ती बचावली. गुजरातमध्ये रविवारी ही घटना घडली.

नेमकं काय घडलं?

30 वर्षीय डॉ. दर्शना प्रजापतीने आपली आई मंजुळाबेन (59) आणि धाकटी बहीण फाल्गुनी (28) यांचा जीव घेतला. काटग्राम भागातील राहत्या घरी शनिवारी रात्री ड्रग्जचे इंजेक्शन दिल्याने रविवारी सकाळी दोघींचा मृत्यू झाला. त्याच वेळी मोठ्या प्रमाणावर झोपेच्या गोळ्या घेऊन तिने स्वतःचं आयुष्यही संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा जीव वाचला असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आयुष्याचा कंटाळा आल्यामुळे टोकाचं पाऊल

ड्रग्ज ओव्हरडोसमुळे मंजुळाबेन आणि फाल्गुनी यांचा मृत्यू झाला, तर डॉ. दर्शना यांच्यावर उपचार सुरु आहेत. आयुष्याचा कंटाळा आल्यामुळे टोकाचं पाऊल उचलल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. आई आणि बहीण तिच्यावर अवलंबून असल्यामुळे आत्महत्येपूर्वी त्यांचाही जीव घेण्याचा निर्णय तिने घेतला. पोस्टमार्टममध्ये तिने दिलेल्या इंजेक्शनचे तपशील समजतील, असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

चौक बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काटग्राम भागातील सहजानंद सोसायटीमध्ये डॉ. दर्शना प्रजापती आपली आई मंजुळाबेन, धाकटी बहीण फाल्गुनी, भाऊ आणि वहिनी यांच्यासोबत राहत होती. घटनेच्या वेळी तिचे भाऊ आणि वहिनी घरी नव्हते. दोघींचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी दर्शनाचा जबाब नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

आईस्क्रिममध्ये विष मिसळून आत्महत्येचा प्रयत्न, महिला बचावली

दरम्यान, आईस्क्रिममध्ये विष मिसळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा जीव वाचला, मात्र अनवधानाने तेच आईस्क्रिम खाललेल्या तिच्या मुलाचा-बहिणीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार काही महिन्यांपूर्वी केरळमध्ये समोर आला होता. आत्महत्येचा प्रयत्न आणि हत्येप्रकरणी केरळ पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला होता.

संबंधित बातम्या :

आईस्क्रिममध्ये विष मिसळून आत्महत्येचा प्रयत्न, महिला बचावली, अनवधानाने मुलगा-बहिणीचा मृत्यू

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.