डोक्यात हातोड्याने वार, जावयाकडून राहत्या घरी सासूची हत्या
राहुलच्या मद्य विक्रीच्या व्यवसायावरुन जावई विशाल आणि सासूबाई सविता पटेल यांच्यात अनेक वेळा वाद झडत असत. सविता यांचा राहुलच्या व्यवसायाला पूर्ण पाठिंबा होता. यावरुनच खटके उडाल्यानंतर विशालने ही हत्या केली असावी
![डोक्यात हातोड्याने वार, जावयाकडून राहत्या घरी सासूची हत्या डोक्यात हातोड्याने वार, जावयाकडून राहत्या घरी सासूची हत्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/12/06200815/crime-compressed-14.jpg?w=1280)
गांधीनगर : डोक्यात हातोड्याने घणाघाती वार करुन जावयाने सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मेहुण्याला अवैध धंद्यात साथ दिल्याच्या रागातून जावयाने वृद्धेचा खून केल्याचा आरोप आहे. गुजरातमधील बडोद्यात हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. आरोपी विशाल अमीनने हत्येनंतर पोलिसात आत्मसमर्पण केले.
काय आहे प्रकरण?
बडोद्यातील मांजलपूर भागातील कल्याणबाग सोसायटीत ही घटना घडली. सविता पटेल यांच्या डोक्यात हातोड्याने एकामागून एक वार करत जावई विशाल अमीनने त्यांचा जीव घेतला. त्यानंतर तो स्वतः मांजलपूर पोलीस स्टेशनमध्ये शरण गेला.
किचनमध्ये महिलेचा मृतदेह
या घटनेची माहिती पोलिसांनी पटेल यांची कन्या रिंकू अमीनला दिली. रिंकूने आईची घरी धाव घेतली, त्यावेळी किचनमध्ये तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. तर हत्येसाठी वापरलेला हातोडाही सिंकमध्ये पडलेला होता.
भावाच्या अवैध मद्यविक्रीच्या व्यवसायावरुन वाद
रिंकूने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचा भाऊ राहुल पटेल दारुची अवैध विक्री करत असे. या कारणामुळे तिचा पती म्हणजेच आरोपी विशाल अमीनला अनेक वेळा पोलीस स्टेशनला चकरा माराव्या लागत असत. त्यामुळे राहुलने मद्य व्यवसाय करु नये, अशी विशालची इच्छा होती.
राहुलच्या मद्य विक्रीच्या व्यवसायावरुन जावई विशाल आणि सासूबाई सविता पटेल यांच्यात अनेक वेळा वाद झडत असत. सविता यांचा राहुलच्या व्यवसायाला पूर्ण पाठिंबा होता. यावरुनच खटके उडाल्यानंतर विशालने ही हत्या केली असावी, असा अंदाज रिंकूने वर्तवला आहे. पोलिसांनी हत्ये प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित बातम्या :
नात्याला काळिमा फासणारी घटना; 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत बापच करत होता…
तीन महिन्यांचा पगार मागितल्याचा राग, मालकाने तरुणाला जिवंत जाळलं
बॉयफ्रेण्डसोबत वाजलं, 14 व्या मजल्यावरुन उडी मारत परदेशी युवतीची आत्महत्या