नको तिथं डोकं! खिडकीतून घुसण्यासाठी चोराने तीन महिन्यात 10 किलो वजन घटवलं, 37 लाखांवर डल्ला

जवळपास तीन महिने मोती सिंह चौहान याने दिवसातून फक्त एक वेळ जेवण केले. रात्रीचे जेवण त्याने टाळले. व्हेंटिलेशनमधून पार जाण्यासाठी 10 किलो वजन कमी करायचे होते, त्यामुळे त्याला जिभेवर नियंत्रण ठेवणे भाग होते.

नको तिथं डोकं! खिडकीतून घुसण्यासाठी चोराने तीन महिन्यात 10 किलो वजन घटवलं, 37 लाखांवर डल्ला
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 9:42 AM

गांधीनगर : वजन कमी करण्याचे विचित्र मार्ग आणि तितकीच विचित्र कारणं आपण ऐकली असतील. प्रेयसीला इम्प्रेस करणं, धावत ट्रेन पकडता येणं इथपासून स्वतःला फिट ठेवता येणं आणि सोशल मीडियावर फोटो पोस्ट करता यावेत, म्हणून अनेक जण वजन घटवताना दिसतात. परंतु गुजरातमधील एका व्यक्तीने वजन कमी करण्याचे अजब कारण समोर आले आहे. ते म्हणजे त्याला खिडकीतून आत घुसून सहज चोरी करता येऊ शकेल.

काय आहे प्रकरण?

अहमदाबाद शहरात राहणारा 36 वर्षीय मोती सिंह चौहान हा मोहित मराडिया यांच्या घरी काम करत होता. वारंवार घरी येणे-जाणे असल्यामुळे घरातील सर्व मौल्यवान वस्तू कुठे ठेवल्या आहेत, याची त्याला चांगलीच माहिती होती. त्यामुळे त्याने मराडियांच्या घरात चोरी करण्याचे ठरवले.

व्हेंटिलेशनमधून आत जाण्याचा निर्णय

आता यात गोम अशी की मोहित मराडिया यांनी आपल्या घराला इलेक्ट्रॉनिक दरवाजांनी संरक्षित केले होते. जे तोडले जाऊ शकत नव्हते. म्हणून त्याने काहीतरी आगळी वेगळी युक्ती लढवण्याचा प्रयत्न केला. त्याने व्हेंटिलेशनमधून आत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्याला वजन कमी करावे लागणार होते.

एक वेळ जेवण, 10 किलो वजन कमी

जवळपास तीन महिने मोती सिंह चौहान याने दिवसातून फक्त एक वेळ जेवण केले. रात्रीचे जेवण त्याने टाळले. व्हेंटिलेशनमधून पार जाण्यासाठी 10 किलो वजन कमी करायचे होते, त्यामुळे त्याला जिभेवर नियंत्रण ठेवणे भाग होते. हे उपद्व्याप करुन बारीक होण्यात तो यशस्वी झाला. आणि त्याने घरातील तब्बल 37 लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला.

सीसीटीव्हीमध्ये खेळ खल्लास

त्याने आपल्या तंत्राच्या सहाय्याने घरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना चकवा देण्यात यश मिळवले, परंतु स्थानिक हार्डवेअरच्या दुकानातून साहित्य खरेदी करतानाचे फुटेज सापडल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतरच चौहानने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी केलेला पर्दाफाश पाहून मराडिया कुटुंबही अवाक झाले. चौहानच्या सेल फोन लोकेशननेही त्याची पोलखोल केली आणि पोलिसांना त्याला पकडण्यात मदत झाली.

संबंधित बातम्या :

बहिणीच्या आत्महत्येनंतर पत्नीचा खून, विषप्राशन केलेल्या पुण्यातील पतीचाही अखेरचा श्वास

लग्न ठरल्यानंतर अश्लील मेसेज पाठवणे हा भावी जोडीदाराच्या विनयशीलतेचा अपमान नाही : कोर्ट

कल्याणमध्ये अज्ञात कारणावरून रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....