आठवी पास बोगस डॉक्टर करत होते रुग्णांवर उपचार, 80 हजारांत घेतली पदवी, एक-दोन नव्हे 14 बनावट डॉक्टरांचा भांडाफोड
Fake doctors arrested: बनावट डॉक्टरांची माहिती लोकांना मिळाली. त्यानंतर लोकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आणि पदवींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणाची माहिती रॅकेटला मिळाली. त्यानंतर त्यांनी आपली योजना बदलली.
Fake doctors arrested: केवळ आठवी आणि बारावी पास करणारे युवकांनी रुग्णांचा जीवाशी खेळ चालवला होता. 60,000 ते 80,000 रुपयांमध्ये बनावट डॉक्टरांची पदवी घेऊन प्रॅक्टीस सुरु केली होती. गुजरात पोलिसांना या टोळाची सुगावा लागला. त्यांनी सुरतमध्ये छापा टाकून 14 बोगस डॉक्टरांना अटक केली. अटक करण्यात आलेला टोळीचा प्रमुख रमेश आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बोर्ड ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथिक मेडिसिन (बीईएचएम) च्या नावाने बोगस पदव्या देत होता. तपासणी करताना एकूण 1,500 पेक्षा जास्त बनावट पदव्या मिळाल्या. तसेच रजिस्ट्रेशन फॉर्म, डॉक्टरांचे रजिस्ट्रेशनचे रजिस्टर, मार्कशीट, बीईएमएसची डिग्री, आयडी कार्ड, कोरे सर्टिफिकेट, सर्टिफिकेटच्या झेरॉक्स 15, रिन्यूअल फॉर्म 8 मिळाले.
पैसे भरल्यावर 15 दिवसांत पदवी
पोलिसांनी ही कारवाई पांडेसरा तुळसी धाम सोसायटीत कविता क्लिनिक, ईश्वर नगर सोसायटीमध्ये श्रेयान क्लिनिक, रणछोड नगरमधील प्रिन्स क्लिनिकवर केली. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात बनावट पदव्या घेऊन अनेक जण आपले क्लिनिक चालवत होते. बनावट पदवी असलेले तीन जण अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेतील सूत्रधारांनी एक बोर्डाचे गठत केले होते. त्यासाठी पाच जणांची नियुक्ती बोर्डात केली होती. 70 हजार रुपयांमध्ये ही लोक प्रशिक्षण देत होते. पैसे भरल्यानंतर 15 दिवसांत पदवी दिली जात होती. दरवर्षी डॉक्टरांना नूतनीकरणासाठी 5,000 ते 15,000 रुपये द्यावे लागत होते.
लोकांना माहिती मिळाल्यावर रॅकेटचा दुसरा उद्योग
बनावट डॉक्टरांची माहिती लोकांना मिळाली. त्यानंतर लोकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आणि पदवींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणाची माहिती रॅकेटला मिळाली. त्यानंतर त्यांनी आपली योजना बदलली. या रॅकेटने गुजरात आयुष विभागाने जारी केलेल्या पदव्या देण्यास सुरुवात केली. बीईएचएम बोर्ड आणि गुजरातच्या आयुष विभागाने करार केला असल्याचा दावा केला. या प्रमाणपत्रामुळे ॲलोपॅथी, होमिओपॅथीचा सराव करू शकतात, असा दावा करण्यात आला.