गार्डनमधून अचानक ज्योती घरी आली, समोर पाहते तर नवरा आणि वहिनी….
डोळ्यासमोरच दुश्य पाहून तिला विश्वास बसला नाही, सुखी संसाराला जणू नजर लागली. नवरा सुनीलने तिच्यामध्ये इंटरेस्ट दाखवणं बंद केलं. एकदिवस ज्योती तिच्या मुलांना खेळण्यासाठी म्हणून गार्डनमध्ये घेऊन गेली होती.
अहमदाबाद : लग्नाच्या नात्यामध्ये विश्वास खूप महत्त्वाचा असतो. एकदा विश्वासाला तडा गेला की, सुखी संसार कोसळून पडायला फार वेळ लागत नाही. असच एक प्रकरण समोर आलय. दोघांच्या लग्नाला 14 वर्ष झाली होती. सर्व काही सुरळीत सुरु होतं. या जोडप्याला दोन मुलं होती. एक 13 वर्षाची मुलगी आणि सात वर्षांचा मुलगा. ज्योती तिच्या संसारात खूश होती. ज्योती पटेलच (36) अहमदाबाद नरोदा येथे राहणाऱ्या सुनील पटेल बरोबर लग्न झालं होतं. पण दोघांच्या सुखी संसाराला कोणाचीतरी दुष्ट लागली. कुटुंब, मुलांमध्ये रमणाऱ्या ज्योतीने महिला पोलीस स्टेशनमध्ये नवरा सुनील, दीर त्याची बायको आणि सासू-सासऱ्यांविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवलीय.
तिच्यामध्ये इंटरेस्ट दाखवणं बंद केलं
आयपीसीच्या कलम 498 अ अंतर्गत हा FIR नोंदवण्यात आला आहे. ज्योतीने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर पहिली सात वर्ष खूप आनंदात, सुखात गेली. पण भावाच लग्न झाल्यानंतर सुनीलची वागणूक बदलली. नवरा सुनीलने तिच्यामध्ये इंटरेस्ट दाखवणं बंद केलं. मुलाची काळजी घेणं देखील त्याने कमी केलं. सुनील जास्तवेळ त्याच्या भावाच्या बायकोबरोबर बोलू लागला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं.
चप्पल बदलायची म्हणून घरी आली, तेव्हा तिने….
एकदिवस ज्योती तिच्या मुलांना खेळण्यासाठी म्हणून गार्डनमध्ये घेऊन गेली होती. मुलाच्या पायातील चप्पल बदलायची होती, म्हणून ती मध्येच घरी आली. त्यावेळी तिने जे समोर पाहिलं, त्यावर तिचा विश्वास बसला नाही. नवरा आणि वहिनीला तिने नको त्या अवस्थेत पकडलं. ती तिथून निघून गेली व नवऱ्याबरोबर बोलणं तिने थांबवलं.
एका रात्री किचनमध्ये काय पाहिलं?
त्यानंतर काही दिवसांनी एका रात्री ज्योतीने पुन्हा एकदा दोघांना किचनमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं. तिने या बद्दल नवऱ्याला जाब विचारला, तेव्हा त्याने तुला काय हवं ते करुन घे असं उत्तर दिलं. ज्योती त्यानंतर माहेरी निघून गेली. तिने सासू-सासरे तिला समजावण्यासाठी आले. त्यावेळी नवऱ्याने त्याची चूक मान्य केली. पण तिला घरी परत जायच नव्हतं. तिने पोलीस स्थानकात जाऊन सासरच्या मंडळींविरोधात तक्रार नोंदवली.