बाप लेकीच्या नात्याला काळीमा! वडील आणि भाऊ तिच्यासोबत करत होते तसं कृत्य शेवटी तिने…

दिल्लीजवळील गुरुग्राममधील एका घटनेनं खळबळ उडाली आहे. परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असून चर्चेचा विषय ठरत आहे. अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं आपल्या भाऊ आणि वडिलांवर धक्कादायक आरोप केला आहे.

बाप लेकीच्या नात्याला काळीमा! वडील आणि भाऊ तिच्यासोबत करत होते तसं कृत्य शेवटी तिने...
अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी बापाला जन्मठेपImage Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 4:52 PM

दिल्ली : दिल्लीजवळील गुरुग्राममधील एका घटनेनं खळबळ उडाली आहे. परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असून चर्चेचा विषय ठरत आहे. अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं आपल्या भाऊ आणि वडिलांवर लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. इतकंच काय 17 वर्षीय विद्यार्थिनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचताना शिक्षकांसमोर ढसाढसा रडली. याबाबत कोणाला सांगितलं तर जीवे मारण्याची धमकीही दिली असल्याचं तिने सांगितलं. वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापकांना तिचं असं म्हणणं ऐकल्यानंतर धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी तिला घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी पीडित तरुणीची जवळपास चार तास चौकशी केली आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलीस स्टेशनमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, “तक्रारीनंतर आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. कायद्यानुसार कारवाई केली जाईल.”

प्रकरण कसं आलं समोर?

घटना खेरकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असून पोलिसांनी सांगितलं की, “विद्यार्थिनी गेल्या काही दिवसांपासून टेन्शनमध्ये असायची. यानंतर तिने हिम्मत करून शिक्षक आणि मुख्याध्यापकांना याबाबत सांगितलं. लैगिंक अत्याचार दुसरं तिसरं कोणी करत नाही वडील आणि भाऊच करतात. तसेच कोणाला सांगितलं जीवे मारू असंही तिने सांगितलं”. या प्रकरणी पोलीस आता अधिक तपास करत आहेत. तसेच आरोपींनी चौकशी अंती अटक केली जाईल असंही सांगितलं.

यापूर्वी अशाच प्रकरणात 17 वर्षांची शिक्षा

गेल्या काही वर्षात लैंगिग शोषणाचे अनेक गुन्हे समोर येत असल्याने खळबळ उडाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतील एका विशेष न्यायालयाने लैंगिक शोषण केल्याप्रकरणी वडिलांना 17 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याने 13 वर्षीय मुलीला घरी दोन वर्षे बांधून ठेवलं होतं. तसेच मारहाण करून अत्याचार केले होते.

हा गंभीर गुन्हा असूनही आरोपीने स्वत:चा बचाव करण्यासाठी घरी पत्नी आणि चार मुलं असल्याचं सांगितलं. पण कोर्टाने त्याची बाजू ऐकली नाही आणि सांगितलं की, “आरोपीने हा गुन्हा कोणत्याही दबावात केलेला नाही आणि अल्पवयीन मुलीकडून तसं करण्यास प्रवृत्त केलं गेलं नाही.”

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.